तरुण-तरुणी एड्सचे सर्वाधिक बळी : फादर टॉमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:19 PM2017-10-02T16:19:47+5:302017-10-02T16:19:56+5:30

‘एड्सग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामध्ये सर्व वयोगटातील स्त्री-पुरूष, लहान मुलांचाही समावेश आहे़  उपलब्ध आकडेवारीनुसार एड्सचे सर्वाधिक बळी तरूण मुले-मुली पडत आहेत. त्यामुळे त्यांच्यात जागृती करणे पुण्याचे काम आहे,’ असे प्रतिपादन फादर टॉमी यांनी केले. 

Youngest Woman Suffer From AIDS: Father Tommy | तरुण-तरुणी एड्सचे सर्वाधिक बळी : फादर टॉमी

तरुण-तरुणी एड्सचे सर्वाधिक बळी : फादर टॉमी

Next
ठळक मुद्देपाचगणीच्या बेल एअर हॉस्पिटलला विद्यार्थ्यांची भेट

वाई ,2 : ‘एड्सग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामध्ये सर्व वयोगटातील स्त्री-पुरूष, लहान मुलांचाही समावेश आहे़  उपलब्ध आकडेवारीनुसार एड्सचे सर्वाधिक बळी तरूण मुले-मुली पडत आहेत. त्यामुळे त्यांच्यात जागृती करणे पुण्याचे काम आहे,’ असे प्रतिपादन फादर टॉमी यांनी केले. 

किसन वीर महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब तर्फे पाचगणी येथील ‘रेड क्रॉस’ सोसाईटीच्या ‘बेल एअर’ हॉस्पीटलला भेट देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रा सेनाचे दोनशे विद्यार्थी उपस्थित होते़  

यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा़ आनंद घोरपडे व एनसीसीचे समन्वयक लेफ्टनंट समीर पवार व डॉ़  राजेश गावित यांनी आपले मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील ‘रेड रिबन क्लब’चे प्रेसिडेंट केदार काळे, व्हाईस प्रेसिडेंट नाझिमा पिझारी तसेच एनसीसीचे एसओयू चेतन कचरे व एनएसएसचे विद्यार्थी प्रतिनिधी सागर फणसे, सोनाली सणस ग्रुप लिडर्स आरती भोसले, व गणेश कदम यांनी केले.

या प्रसंगी एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी बेल एअर हॉस्पिटलमध्ये दोन तास श्रमदान केले व बेल एअर हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांना फळेवाटप केले़  त्यानंतर विद्यार्थ्यांनी हॉस्पिटल परिसर व नर्सिंग कॉलेजची पोहणी केली व हॉस्पिटल परिसरात वृक्षारोपण केले़  हॉस्पिटल कार्याची ओळख करून देणारी डॉक्युमेंट्री फिल्म दाखविण्यात आली़ 

आरती भोसले व गणेश कदम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली़  प्रथम ‘फादर टॉमी’ यांना रेड रिबन लावून त्यांचा सत्कार केला. चेतन कचरे यांनी आभार केले़  या कार्यक्रमासाठी महाविदयालयातील प्रा़ आनंद घोरपडे, प्रा़ समीर पवार व डॉ़  राजेश गावीत हे उपस्थित होते.

हॉस्पीटल मधील स्टाफ (मेडीकल सोशल वर्कर) जतीन जोशी, संदीप बाबर, दिपक मदने, लिडा जतीन, अर्चंना शिंदे, हेमा बनकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले़

Web Title: Youngest Woman Suffer From AIDS: Father Tommy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.