Satara: ब्लॅकमेल करून शाळकरी मुलावर तरुणाने केला अनैसर्गिक अत्याचार

By दत्ता यादव | Published: October 5, 2023 12:26 PM2023-10-05T12:26:37+5:302023-10-05T12:27:49+5:30

वर्षभरापासून तो पीडित मुलाला ब्लॅकमेेल करून त्याच्यावर अत्याचार करत होता

Youth brutally assaults school boy by blackmailing him in Satara | Satara: ब्लॅकमेल करून शाळकरी मुलावर तरुणाने केला अनैसर्गिक अत्याचार

Satara: ब्लॅकमेल करून शाळकरी मुलावर तरुणाने केला अनैसर्गिक अत्याचार

googlenewsNext

सातारा : एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलावर एका चोवीस वर्षांच्या तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी संबंधित तरुणावर पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय उर्फ सोनू दिलीप राऊत (वय २४, रा. पुसेगाव, ता. खटाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ‘तू इयत्ता १० वीतील एका मुलीबरोबर इन्स्टाग्रामवरून बोलतो, हे मी तुझ्या व त्या मुलीच्या वडिलांना सांगेन,' अशी धमकी देऊन अक्षय राऊतने पीडित मुलाला बोलावून घेतले. त्यानंतर एका ठिकाणी नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचे व्हिडीओ शूटिंग करून इन्स्टाग्रामवर पाठवले. वर्षभरापासून तो पीडित मुलाला ब्लॅकमेेल करून त्याच्यावर अत्याचार करत होता. 

अखेर त्याचा त्रास असह्य झाल्याने मुलाने हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर घरातल्यांनी दि. ३ रोजी रात्री अकरा वाजता पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. सोनू राऊत हा चहाची टपरी चालवतो. पुसेगाव पोलिस ठाण्यात त्याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण, भादवि कलम ३७७ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याला अटक झाली नव्हती. सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Youth brutally assaults school boy by blackmailing him in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.