युवा महोत्सव ऑनलाईन रंगला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:14+5:302021-07-15T04:27:14+5:30
रामापूर : पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव आभासी पद्धतीने उत्साहात पार पडला. कोरोनाचा प्रादुर्भाव ...
रामापूर : पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव आभासी पद्धतीने उत्साहात पार पडला.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दुसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे महाविद्यालयाचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने युवा महोत्सवाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्याचे नियोजन केले होते. सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे यजमानपद पाटणच्या बाळसाहेब देसाई महाविद्यालयाकडे देण्यात आले होते. त्यानुसार नुकताच हा युवा महोत्सव संपन्न झाला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कलेचे सर्व सांघिक प्रकार रद्द केले. वैयक्तिक १९ कलाप्रकारांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी वक्तृत्व, शास्त्रीय गायन, सुगम गायन, सूरवाद्य, तालवाद्य, रांगोळी, मातीकाम, कातरकाम, भित्तीचित्र, व्यंग्यचित्र, स्थळचित्र या कलाप्रकारांचा समावेश होता.
युवा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. एस. डी. पवार, जिल्हा समन्वयक डॉ. सी. यू. माने, कला मंडळाचे समन्वयक डॉ. पी. जे. ऐवळे, प्रा. व्ही. एस. पानस्कर, प्रा. एस. एस. पवार, डॉ. पी. वाय. फडणीस यांनी प्रयत्न केले.