विनयभंगप्रकरणी युवकाला एक वर्षाची शिक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 01:24 PM2019-07-06T13:24:18+5:302019-07-06T13:25:29+5:30

एका चौदा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने जीवन दिनकर सावंत (रा. सावंतवाडी, ता.सातारा) याला एक वर्षे सक्तमजूरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Youth gets one-year sentence for molestation | विनयभंगप्रकरणी युवकाला एक वर्षाची शिक्षा 

विनयभंगप्रकरणी युवकाला एक वर्षाची शिक्षा 

googlenewsNext
ठळक मुद्देसाक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने जीवन सावंतला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

सातारा : एका चौदा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने जीवन दिनकर सावंत (रा. सावंतवाडी, ता.सातारा) याला एक वर्षे सक्तमजूरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  

जीवन सावंत याने २०१६ साली एका चौदा वर्षीय मुलीशी जवळीक साधून तिला शरीर सुखाची मागणी केली होती. याप्रकरणी पीडितेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मुलीच्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार सावंत याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक स्मिता नवघरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने जीवन सावंतला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

 सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पोलीस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे शुभांगी वाघ व शुभांगी भोसले यांनी सहकार्य केले.

Web Title: Youth gets one-year sentence for molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.