Satara: मलवडी येथे तरुणाचा धारदार शस्त्राने खून, कारण अस्पष्ट
By दत्ता यादव | Updated: October 19, 2023 13:26 IST2023-10-19T13:26:13+5:302023-10-19T13:26:59+5:30
गावाजवळच आढळला मृतदेह

Satara: मलवडी येथे तरुणाचा धारदार शस्त्राने खून, कारण अस्पष्ट
सातारा : फलटण तालुक्यातील मलवडी येथील अनिल चव्हाण (वय ३५) या तरुणाचा अज्ञातांनी डोक्यात धारधार शस्त्राचे वार करून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना आज, गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल चव्हाण याचे पुरंदर तालुक्यातील वाल्हे हे गाव आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून तो मलवडीतील मामाकडे राहत होता. मोलमजुरीचे मिळेल ते काम तो करत होता. दरम्यान, गुरुवारी सकाळी मलवडी गावापासून जवळच त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात गावकऱ्यांना आढळून आला. यानंतर फलटण ग्रामीण पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
हल्लेखोरांनी अनिल चव्हाण याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने चार वार केले आहेत. त्याचा कोणत्या कारणातून खून झाला, हे अद्याप समोर आले नसून मारेकऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती.