युवापिढी नवक्रांतीने देशाची प्रतिष्ठा निर्माण करेल

By admin | Published: January 10, 2016 10:42 PM2016-01-10T22:42:48+5:302016-01-11T00:49:05+5:30

सेवागिरी यात्रा : पुसेगाव येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

Youth Pride will create a new country's reputation | युवापिढी नवक्रांतीने देशाची प्रतिष्ठा निर्माण करेल

युवापिढी नवक्रांतीने देशाची प्रतिष्ठा निर्माण करेल

Next

पुसेगाव : ‘भारतात युवकांची संख्या मोठी आहे. आपल्या हातातील शक्तीचा, अंतरीम मानसिक व शारीरिक ऊर्जेचा योग्यरितीने वापर केला तर युवापिढी नवक्रांती घडवू शकते,’ असा विश्वास पंढरपूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तमराव मुधोळकर यांनी व्यक्त केला.खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव, माजी अध्यक्ष सुनीलशेठ जाधव, सुभाष अप्पा जाधव, बाळासाहेब जाधव, पोपटराव जाधव, एम. आर. जाधव, प्राचार्य हैबतराव नांगरे-पाटील, प्रा. एम. एस मुजावर, प्रा. डी. पी. शिंदे, मुख्याध्यापक राजेंद्र घाडगे, मुख्याध्यापिका उषादेवी जाधव, प्रा. संजय क्षीरसागर, डॉ. अंबादास कदम उपस्थित होते.
डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ‘आजची युवा पिढी चांगल्या मार्गाला गेली तरच देशाची प्रगती होईल. त्यांच्या विचारांना देवस्थानच्या माध्यमातून युवा महोत्सवाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मोहन गुरव यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. मुजावर यांनी आभार
मानले. (प्रतिनिधी)


आज शरीरसौष्ठव स्पर्धा, श्वान प्रदर्शन
यात्रास्थळावर उभारण्यात आलेल्या सेमिनार हॉलमध्ये दि. ११ रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी ५० ते ५५, ५५ ते ६०, ६० ते ६५, ६५ ते ७०, ७० ते ७५,७५ ते ८० व ८० किलो वजनी गटांवरील असे गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. श्री सेवागिरी किताब २०१६ च्या मानकऱ्यास १० हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच विविध जातींच्या श्वानांचे प्रदर्शन होणार आहे.

Web Title: Youth Pride will create a new country's reputation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.