पुसेगावची तरुणाई भरणार गोरगरिबांचे पोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:45+5:302021-06-03T04:27:45+5:30

पुसेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सातारा जिल्ह्यामध्ये अजून आठ दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. या संचारबंदीच्या काळात ...

The youth of Pusegaon will fill the stomachs of the poor | पुसेगावची तरुणाई भरणार गोरगरिबांचे पोट

पुसेगावची तरुणाई भरणार गोरगरिबांचे पोट

Next

पुसेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सातारा जिल्ह्यामध्ये अजून आठ दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. या संचारबंदीच्या काळात अनेक गोरगरीब लोकांना दोनवेळचे जेवणही मिळणे अशक्य झाले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत पुसेगाव येथील युवकांनी स्वखर्चातून श्री सेवागिरी थाळीची मोफत व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते बुधवारी सकाळी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुनील जाधव, तलाठी गणेश बोबडे व या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.

कोरोनाने गेली दोन वर्ष जनता हतबल झाली आहे. अनेकांचे उत्पन्न बंद झाले आहे. हातावर पोट असणारी कुटुंबे चिंतातूर आहेत. अशावेळी लोकांसाठी मोफत जेवणाची सोय व्हावी म्हणून पुसेगाव परिसरातील अनेक बेघर, परप्रांतीय प्रवासी, हातावरचे पोट असणारे मजूर, दैनंदिन बाजार न करू शकणारे तसेच निराधार व्यक्तींसाठी तरूणांनी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. श्री सेवागिरी थाळी मोफत जेवण सुरु करण्यासाठी सुश्रुत जाधव, फडतरे, सचिन देशमुख, विशाल जाधव, मनोज राऊत, अमजम मुलानी व संगीता जाधव यांनी प्रयत्न केले.

फोटो : ०२ सेवागिरी

पुसेगाव येथे श्री सेवागिरी थाळीचा शुभारंभ मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सुनील जाधव आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. (छाया : केशव जाधव)

Web Title: The youth of Pusegaon will fill the stomachs of the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.