कोरोना रोखण्यासाठी तरुणाई सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:36 AM2021-05-15T04:36:49+5:302021-05-15T04:36:49+5:30

किडगाव : ‘आधुनिक युगातील तरुण पिढी समाजासाठी काही तरी करून नवी दिशा देणारी असावी, असे समाजाला वाटत असते. मात्र, ...

The youth rushed to stop Corona | कोरोना रोखण्यासाठी तरुणाई सरसावली

कोरोना रोखण्यासाठी तरुणाई सरसावली

Next

किडगाव : ‘आधुनिक युगातील तरुण पिढी समाजासाठी काही तरी करून नवी दिशा देणारी असावी, असे समाजाला वाटत असते. मात्र, बहुतांश ठिकाणी तरुण पिढी मोबाइलच्या विळख्यात अडकलेली दिसते. मात्र, किडगाव येथील शिवबा ग्रुपच्या युवकांनी याला छेद दिला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी त्यांनी संपूर्ण गाव निर्जंतुक करण्यासाठी औषधाची फवारणी केली आहे.

तिथी परंपरेनुसार १३ मे रोजी सर्वत्र शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोना काळ असल्याने कोठेही लवाजमा किंवा ज्योत घेऊन धावणे आणि ज्योतीचे उत्साहात स्वागत करणे याला फाटा देऊन या ग्रुपने कोरोना काळात आम्ही काही तरी गावाचे देणे लागतो आणि आपण जर चांगले काम केले तर याचे फळ गावाला चांगलेच मिळेल. या उद्देशाने शिवबा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी शिवजयंती साधेपणाने साजरी करून गावामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण गाव तब्बल चार तासांत निर्जंतुकीकरण करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

सध्या सर्वत्र कोरोना रोगाने हाहाकार माजवला आहे. अशाच कालखंडात या ग्रुपच्या माध्यमातून ८४ युवकांनी रक्तदान करून रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न केला आहे. तसेच आतापर्यंत सुमारे ४५ कोरोना रुग्णांना बेडची व्यवस्था मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. गरजू रुग्णांसाठी मदतीचा हातही या ग्रुपच्या माध्यमातून दिला जातो.

शिवजयंतीचे औचित्य साधून या ग्रुपच्या माध्यमातून पूर्ण गावामध्ये ट्रॅक्‍टरच्या साह्याने तसेच ज्या ठिकाणी ट्रॅक्टर जात नाही. त्या ठिकाणी पंपाच्या साह्याने निर्जंतुकीकरण करण्यासाठी युवकांनी कसोशीने प्रयत्न केला. तब्बल चार तासांमध्ये गाव निर्जंतुकीकरण करण्यात या युवकांना यश आले. असाच आदर्श इतर गावातील युवकांनी घेतल्यास आपण आपल्या गावापासून कोरोना रोखण्यासाठी निश्चितच यशस्वी होऊ, असा आशावाद गौरव इंगवले यांनी व्यक्त केला.

यासाठी संतोष इंगवले, सचिन इंगवले, पंकज चतुर, गौरव इंगवले, विक्रम इंगवले, विवेक शेडगे, अमोल मेणकर, जय टिळेकर, सागर गायकवाड, विलास इंगवले, प्रणव टिळेकर, यश शिंदे, परितोष इंगवले, अभिषेक इंगवले, वैभव इंगवले, नितीन शेडगे, मारुती इंगवले, आकाश इंगवले, युनूस पठाण, ओंकार टिळेकर, प्रतीक शिर्के, शिवराज इंगवले, महेश इंगवले, अक्षय गुरव परिश्रम घेतले.

फोटो १४किडगाव-कोरोना

किडगाव येथील शिवबा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी गावात औषध फवारणी केली. (छाया : गुलाब पठाण)

Web Title: The youth rushed to stop Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.