गडकोट संवर्धनात युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा : संभाजी भिडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:36+5:302021-02-16T04:39:36+5:30

वाई : ‘आजच्या तरुण पिढीने आपला इतिहास समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातील गडकोटांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलून ती पेलण्याची नितांत गरज ...

Youth should take active part in Gadkot conservation: Sambhaji Bhide | गडकोट संवर्धनात युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा : संभाजी भिडे

गडकोट संवर्धनात युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा : संभाजी भिडे

googlenewsNext

वाई : ‘आजच्या तरुण पिढीने आपला

इतिहास समजून घेण्यासाठी

महाराष्ट्रातील गडकोटांचे संवर्धन

करण्याची जबाबदारी उचलून ती पेलण्याची नितांत गरज आहे,’ असे मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे

गुरुजी यांनी व्यक्‍त केले.

दसवडी (ता. वाई) येथील सेवागिरी महाराजांच्या मंदिरात आयोजित

केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मंदिराचे ट्रस्टी आनंदशेठ फणसे, सरपंच कृष्णदेव फणसे,

बाबासाहेब फणसे, सुनील फणसे,

प्रशांत फणसे उपस्थित होते.

भिडे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी

महाराजांचा इतिहास राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शिक्षणाच्या

अभ्यासक्रमातून हद्दपार होताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या लढाया, गडकोटांची बांधणी यासारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास जगातील पुढारलेली राष्ट्रे करीत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या लढाया आज संपूर्ण जगाला अभ्यासक म्हणून ठरत असताना आपल्या देशातील हिंदू जाती-पातीचे राजकारण करण्यात मग्न आहेत.

सत्तेसाठी महाराजांच्या नावावर मताचे राजकारण करीत आहेत. भारत

देशामध्ये जगावर राज्य करण्याची

ताकद असताना आपापसांत लढण्यात धन्यता मानण्यात हिंदू समाज व्यस्त आहे. तरुण पिढीला छत्रपती शिवाजी

महाराज खऱ्या अर्थाने समजण्यासाठी

व त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापनेचा निर्णय शासनाच्या मदतीविना घेतला आहे. हे सुवर्ण सिंहासन राष्ट्रीयत्वाचे प्रतीक ठरावे.’

Web Title: Youth should take active part in Gadkot conservation: Sambhaji Bhide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.