गुटखा वितरित करणाऱ्या युवकास कऱ्हाडात पकडले ; वाहतूक शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:03 AM2018-08-24T00:03:50+5:302018-08-24T00:07:17+5:30
कऱ्हाड : बंदी असतानाही गुटख्याची तस्करी करून कऱ्हाड, मलकापूरसह परिसरात त्याचे वितरण करणाºया संशयितास वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून गुटख्याचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.
शहरातील कोल्हापूर नाका येथे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
सूरज शिवाजी नलवडे (रा. गोळेश्वर, ता. कऱ्हाड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडसह मलकापूर परिसरात गुरुवारी सकाळी एक युवक दुचाकीवरून संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. गायकवाड यांनी त्या युवकाच्या दुचाकीचा क्रमांक सर्व वाहतूक पोलिसांना पाठवून त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार हवालदार एस. एम. सावंत, पोलीस नाईक चव्हाण हे कोल्हापूर नाक्यावर वाहनांची तपासणी करत असताना त्यांना संशयास्पदरीत्या एक युवक दुचाकीवरून जाताना दिसला. पोलिसांनी त्याला अडवून त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
हवालदार सावंत यांनी युवकाकडील सॅक तपासली असता त्याच्यामध्ये गुटख्याचे पुडे असल्याचे दिसले. त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तो कºहाड परिसरात बेकायदा गुटख्याचे वितरण करत असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले असून, याबाबतचा अहवाल अन्न सुरक्षा अधिकाºयांना कळवण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसात संबंधित युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.