अपघात रोखण्यासाठी तरुणांचा पुढाकार
By admin | Published: October 26, 2014 09:33 PM2014-10-26T21:33:14+5:302014-10-26T23:29:09+5:30
कोरेगाव : शंभू ग्रुपकडून मुरुमाने खड्डे मुजवून वाहनधारकांना दिलासा
कोरेगाव : सातारा-पंढरपूर राज्यमार्गावर कोरेगावात पडलेले खड्डे मुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग पुढाकार घेत नसल्याचे पाहून शंभो ग्रुपने वाढते अपघात रोखण्यासाठी स्वत: मुरूम टाकून खड्डे मुजविले आहेत. ऐन दिवाळीत कोरेगावकरांना दिलासा मिळाला आहे.
या राज्यमार्गावर मार्केट यार्डसमोर गटाराचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने मोठे खड्डे पडून दलदल तयार झाली आहे. वाहनचालकांना येथून वाहनचालवताना कसरतच करावी लागत होती. रात्रीच्या वेळेत अनेक अपघात झाले आहेत. ऐन दिवाळीची धामधूम व वाढती वाहनांची संख्या लक्षात घेऊन शंभो ग्रुपचे अध्यक्ष अण्णा बर्गे यांनी आपल्या सहकाऱ्यांना एकत्र करून मार्केटयार्ड समोरील खड्डे मुरुमाने मुजवले. कार्यकर्त्यांनी भल्या सकाळी श्रमदान करून अनोखी दिवाळी साजरी केली.
शंभो ग्रुपचे अध्यक्ष अण्णा बर्गे यांच्यासह तेजस बाचल, माऊली कस्तुरे, श्रीकांत जाधव, राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे, संतोष नलावडे, वाय. बी. पाटील, विलास जाधव, संतोष गोरे, श्रीहरी माने, नौशाद शेख, कल्पेश बर्गे, प्रवीण घुले, सागर बल्लाळ, संदीप पोळ, अक्षय साळुंखे, श्रीकांत माने, शुभम घाडगे, लक्ष्मण साळुंखे, अक्षय चव्हाण, सिद्धेश्वर भरते, अजित बर्गे, सुजीत माने, विनायक जगताप, विशाल जगताप, अक्षय पोरे, ज्ञानेश्वर घाडगे, समीर सकट, ह्षीकेश गोरे, प्रशांत बर्गे, संग्राम बर्गे, विक्रम कदम, लव शिंदे, सुरेश डाबी, विकी कदम, सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
नगरविकास कृती समिती निवेदन देणार
या राज्यमार्गावर पडलेल्या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २८ रोजी कोरेगाव नगरविकास कृती समितीच्या माध्यमातून निवेदन देण्यात येणार आहे. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे नगरविकास कृती समितीचे राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे व संतोष नलावडे यांनी सांगितले.