संरक्षण दलातील नोकरीसाठी युवकांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:35 AM2021-01-18T04:35:24+5:302021-01-18T04:35:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : ‘संरक्षण दलातील नोकरीसाठी युवकांनी प्राधान्य द्यावे,’ असे आवाहन बीएसएफमधील सेवानिवृत्त जवान अमोल म्हामणे यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : ‘संरक्षण दलातील नोकरीसाठी युवकांनी प्राधान्य द्यावे,’ असे आवाहन बीएसएफमधील सेवानिवृत्त जवान अमोल म्हामणे यांनी केले.
गुरसाळे (ता. खटाव) येथील अमोल शंकर म्हामणे या बीएसएफमधील जवानाचा सेवानिवृत्तीनिमित्त वडूज येथील जयमल्हार अकॅडमीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अमोल म्हामणे नुकतेच बीएसएफमधून २१ वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. यानिमित्त वडूज येथील जय मल्हार अकॅडमीच्या वतीने सत्कार करण्यात आला. जयमल्हार अकॅडमीचे संस्थापक बनाजी पाटोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. यावेळी मोहन काळे, गोविंद भंडारे, शशिकांत पाटोळे, शेखर इनामदार, श्रीकांत गरवारे, दीपक गरवारे, प्रशांत लोहार, राजेंद्र पाटोळे, अमित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
अमोल म्हामणे म्हणाले, ‘आज कालच्या युवकांना लष्कर अथवा इतर संरक्षण सेवा दलात नोकरी मिळविण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्था कार्यरत झाल्या आहेत. योग्य मार्गदर्शन तसेच परिश्रमाने युवकांना या देशातील संरक्षण दलात नोकरीची संधी मिळू शकते. या नोकरीत मानसन्मान मिळतोच, त्याशिवाय देशाचे सेवा करण्याचे समाधान मिळते. युवकांनी संरक्षण दलातील नोकरीसाठी प्राधान्य द्यावे.’ (वा.प्र.)
१७ वडूज जाहिरात
फोटो : वडूज येथे बीएसएफमधील जवानाचा प्रा. बनाजी पाटोळे यांच्या हस्ते सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.