टोल भरताच यमदूताचे दर्शन

By admin | Published: November 23, 2014 08:38 PM2014-11-23T20:38:39+5:302014-11-23T23:43:04+5:30

आनेवाडीजवळ धोका : महामार्ग प्राधिकरण, ठेकेदाराचे दुर्लक्ष; वर्षापासून रेंगाळले पुलाचे काम

Yumdoot's philosophy of filling the toll | टोल भरताच यमदूताचे दर्शन

टोल भरताच यमदूताचे दर्शन

Next

कुडाळ : भरमसाठ टोल वसुली करून वाहनचालकांचा खिसा कापणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंपनीने प्रवासी, वाहनचालकांच्या जीवाशी अक्षरश: खेळ मांडला आहे. मुळात हा चौपदरी रस्ता व्यवस्थित नसताना सहापदरी रस्ता करण्याचा घाट घातला आहे. मात्र, ठिकठिकाणी पुलांची, रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्याजवळच पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे या ठिकाणी खंडाळ्यातील अपघाताची पुनरावृत्ती होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तरी तातडीने या पुलाचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी होत आहे.
आनेवाडी हे जावळीचे प्रवेशद्वार ओह. वरील २० ते २५ गावांना जोडणाऱ्या या रस्त्याजवळ वर्षभरापासून पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच लेनवरून सुरू आहे. टोलनाक्यावर गर्दी होऊन ट्रॅफिक जाम झाले की आनेवाडीकडून आलेल्या वाहनांना मार्गच मिळत नाही. याच ठिकाणी रिक्षा थांबा, बस थांबा देखील आहे. या थांब्यावर वाई, पुण्याकडे जाणारे शेकडो प्रवासी एसटीची वाट पाहत उभे असतात.
साताराकडून उताराने अनेक वाहने वेगाने येऊन ताबा सुटल्याने अनेकदा या ठिकाणी फसली आहेत. आतापर्यंत जीवित हानी झाली नसली तरीदेखील वाहतूक अशीच एकेरी राहिली तर खंडाळ्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. तसेच याच ठिकाणी ठेकेदाराने महामार्गालगत मोठा खड्डा खणल्याने आजूबाजूच्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी महामार्गावर सुरू असलेल्या पुलांची कामे पूर्ण करण्याचे आदेश देऊनही कंत्राटदाराकडून या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. कासवाच्या गतीने सुरू असलेल्या या पुलाचे काम कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालक, प्रवाशांमधून होत आहे. (प्रतिनिधी)


नको हा टोलनाका
टोलनाक्यावर अनेकदा गाड्यांची दोन्ही बाजूला भली मोठी रांग लागते. त्यातच या अर्धवट पुलाचा अडथळा. सातारकडून रांग लागली की आनेवाडीच्या वरील गावांमधून येणाऱ्या वाहनांना तासन्तास महामार्ग मोकळा होण्याची वाट पाहावी लागते. कारण ज्या ठिकाणी हा रस्ता महामार्गाला मिळतो, तिथेच या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने एकाच लेनवरून वाहतूक सुरू असते. त्यामुळे आनेवाडीकडून येणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांवर ‘नको हा आनेवाडी टोलनाका’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.


महामार्गालगत असलेल्या आनेवाडी फाट्यावर जवळपास वीस रिक्षा रात्रंदिवस उभ्या असतात. कधी-कधी मोठे सोळा चाकी ट्रेलर वेगात येतात. अशावेळी ते रिक्षावर येतात की काय अशी भीती वाटते. त्यामुळे आम्ही रिक्षास्टॉपवर उभ्या करून बाजूला बसण्यास सुरुवात केली आहे.
- जीवन कर्पे,
रिक्षाचालक, आनेवाडी

आनेवाडी टोलनाक्याजवळच वर्षभरापासून पुलाचे काम सुरू असल्यामुळे एकाच लेनवरून सुरू असलेली वाहतूक अपघाताला निमंत्रण देत आहे.

Web Title: Yumdoot's philosophy of filling the toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.