झकास रस्त्यातील दुभाजक बनलेत भकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:07+5:302021-02-16T04:39:07+5:30
गत दोन वर्षांपूर्वी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले आहे. विद्यानगर परिसरात अनेक कॉलेज असल्यांने वाहनांची कायमच वर्दळ असते. ...
गत दोन वर्षांपूर्वी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले आहे. विद्यानगर परिसरात अनेक कॉलेज असल्यांने वाहनांची कायमच वर्दळ असते. वाहनांची वर्दळ व वाढत्या वेगामुळे अपघात होऊ नये, यासाठी रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकाची निर्मिती करण्यात आली असून, त्यामध्ये विविध प्रकारांची शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. झाडांची वाढ चांगली झाली असल्याने विद्यानगर परिसर शोभीवंत दिसत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने काही ठिकाणची झाडे सुकू लागली आहेत, तर काही ठिकाणची झाडे वाळू लागली आहेत. दुभाजकात गवत तसेच खुरटी झाडे उगवू लागली आहेत. सध्या काही झाडांची पानगळ सुरू आहे. काही ठिकाणी निलगीरची झाडे लावण्यात आली असून त्यांची उंची वाढत आहे. ती झाडे भविष्यात धोक्याची ठरू शकतात.
शोभिवंत दिसणारा रस्ता सध्या झाडे सुकत असल्याने भकास दिसत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून झाडाला पाणी देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
- चौकट
दुभाजकात गवत उगवले आहे. निलगीरच्या झाडांची उंची वाढली आहे. त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. पाण्याअभावी काही ठिकाणची झाडे वाळली आहेत. वेळीच देखभाल न केल्यास सुंदर शोभिवंत दिसणारा परिसर भकास दिसू शकतो.
फोटो : १५केआरडी०४
कॅप्शन : विद्यानगर-कऱ्हाड येथे कृष्णा कॅनॉल ते बनवडी फाटा दरम्यान दुभाजकात असणारी रोपे सध्या होरपळली असून, रस्ता भकास दिसू लागला आहे. (छाया : शंकर पोळ)