‘झेडपी’त दिग्गजांचे पत्ते कट!

By admin | Published: October 6, 2016 12:08 AM2016-10-06T00:08:46+5:302016-10-06T01:13:06+5:30

निम्म्यापेक्षाही जास्त नवे चेहरे दिसणार : अध्यक्ष-उपाध्यक्षांसह बहुतांश प्रस्थापित नेत्यांचे मतदारसंघ आरक्षित

Zep cut giant leaves! | ‘झेडपी’त दिग्गजांचे पत्ते कट!

‘झेडपी’त दिग्गजांचे पत्ते कट!

Next

सातारा : जिल्हा परिषद व ११ पंचायत समित्यांसाठी बुधवारी पार पडलेल्या आरक्षण सोडतीने अनेक मातब्बरांना घायाळ केले. तर अनेकांच्या वाटेतील अडथळे यामुळे आपोआप दूर झाले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या वाई तालुक्यातील बावधन व भुर्इंज या दोन गटांतील खुल्या प्रवर्गातील इच्छुकांच्या आशा मावळल्या. जिल्हा परिषदेच्या राजकारणात आपला पाय रोवू पाहणाऱ्या नेत्यांनाही या आरक्षणामुळे घरी बसण्याची वेळ आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे यांचा मार्डी गट व उपाध्यक्ष रवी साळुंखे यांचा कोडोली गट महिला राखीव झाला आहे. राष्ट्रवादीचे माण तालुक्यातील अनिल देसाई यांचा गोंदवले बुद्रुक हा गटही महिला राखीव झाला आहे. अविश्वास ठरावाच्या राजकारणात राष्ट्रवादीला गोत्यात आणणारे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांचा कुकूडवाड गटही महिला राखीव झाला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निकटचे सहकारी राजू भोसले यांचा परळी गट आता कारी नावाने निर्माण झाला, हा गटही महिला राखीव झाला आहे.
भुर्इंज व बावधन या दोन गटांत इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण पडले. यामुळे बावधनचे माजी कृषी सभापती शशिकांत पिसाळ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, तसेच भुर्इंज गटातील इतर मंडळींना जोरदार धक्का बसला आहे. पाल गटात खुल्या गटाला संधी मिळाली असती, तर कऱ्हाड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील जिल्हा परिषदेत येऊ शकले असते. मात्र, पाल गट महिला राखीव झाल्याने त्यांची संधी हुकली. पुसेसावळी गट महिला राखीव झाल्याने माजी समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे यांचीही संधी हुकली आहे. राष्ट्रवादीचे जि. प.चे पक्षप्रतोद बाळासाहेब भिलारे यांचा भिलार गट महिला राखीव झाल्याने त्यांनाही पर्यायी मतदारसंघ शोधावा लागणार आहे.


यांना मिळणार संधी
संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, सुरेंद्र गुदगे, नितीन भरगुडे-पाटील यांना पुन्हा जिल्हा परिषदेत येण्याची संधी मिळणार आहे.
यांना शोधावे लागणार पर्याय
रवी साळुंखे, राजू भोसले, अनिल देसाई, शिवाजीराव शिंदे, सुभाष नरळे यांचे मतदारसंघ महिला राखीव झाल्याने त्यांना पर्याय शोधावा लागणार आहे.


तेरापैकी बारा नगराध्यक्षपदे राखीव
सातारा सर्वसाधारण महिला : बाकी ठिकाणी नव्यांना संधी

Web Title: Zep cut giant leaves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.