जिल्हा परिषदेतील कर्मचारी बाधित संख्या ८०० च्या उंबरठ्यावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:36 AM2021-03-25T04:36:59+5:302021-03-25T04:36:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच आता जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचारी बाधित होण्याचा आकडाही ...

Zilla Parishad employees on the threshold of 800 affected number ... | जिल्हा परिषदेतील कर्मचारी बाधित संख्या ८०० च्या उंबरठ्यावर...

जिल्हा परिषदेतील कर्मचारी बाधित संख्या ८०० च्या उंबरठ्यावर...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच आता जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचारी बाधित होण्याचा आकडाही वाढत चालला आहे. आतापर्यंत ७९७ कर्मचारी बाधित झाले असून १७ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ७४० कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आढळला. त्यानंतर विविध गावाबरोबरच शासकीय विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला. तर जिल्हा परिषदेत मागीलवर्षी जुलै महिन्यात कोरोना पोहोचला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक विभागात कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत अर्थ, रोजगार हमी योजना, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य आदी विभागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्मचारी आणि अधिकारीही कोरोना बाधित होत आहेत. जिल्हा परिषदेबरोबरच पंचायत समिती, गाव पातळीवरील कर्मचारीही बाधित झाले आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण ७९७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातारा तालुक्यात कार्यरत १३६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कऱ्हाडमध्ये ११०, कोरेगाव १३२, खटाव ७१, खंडाळा तालुका ३७, जावळी २७, पाटण ८३, फलटण तालुका ५३, महाबळेश्वर ३३, माण ५३ आणि वाई तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ६२ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत चालली आहे. तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत कर्मचारीही बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळेच बाधित कर्मचारी आकडा ८०० जवळ पोहोचला आहे. दरम्यान, कोरोनामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये खटाव तालुक्यात कार्यरत सर्वाधिक ५ कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. त्यानंतर पाटण तालुक्यातील ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सातारा, जावळी, कोरेगाव आणि फलटण तालुक्यातील प्रत्येकी दोघां कर्मचाऱ्यांचा तर माणमधील एक कर्मचारी कोरोनामुळे मृत्युमुखी पडला आहे.

चौकट :

कोरोनावर मात केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या तालुकानिहाय...

जिल्हा परिषदेच्या ७९७ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामधील ७४० जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील १२५ जणांचा समावेश आहे. तसेच सातारा तालुक्यातील १३३, पाटण ८०, कऱ्हाड १०९, महाबळेश्वर ३३, खटाव ६१, वाई ५६, फलटण ४६, खंडाळा ३७, जावळी २५ आणि माण तालुक्यात कार्यरत ३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४० कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये माणमध्ये सर्वाधिक १७ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. यानंतर वाई, खटाव, फलटण, कोरेगाव आणि सातारा, कऱ्हाड तालुक्यांचा क्रमांक लागतो.

....................................................

Web Title: Zilla Parishad employees on the threshold of 800 affected number ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.