जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी पतसंस्थेची सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:41 AM2021-04-02T04:41:43+5:302021-04-02T04:41:43+5:30

सातारा : सातारा जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची ८१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात ...

Zilla Parishad fourth class credit union meeting in excitement | जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी पतसंस्थेची सभा उत्साहात

जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी पतसंस्थेची सभा उत्साहात

Next

सातारा : सातारा जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची ८१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात झाली. यावेळी सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच सभासदांच्या हिताचा विचार करून सामान्य कर्जाचा व्याजदर १० वरून ९ टक्के करण्यास मान्यता देण्यात आली, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष महेश गुरव यांनी दिली. त्याचप्रमाणे कर्ज मर्यादा ७ लाख रुपयांवरून १० लाख रुपयेपर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आल्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ नावडकर यांनी सांगितले. तर २०१९-२० या वर्षाचा ११ टक्के लाभांश खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.

या सभेला संचालक रामचंद्र संकपाळ, आनंदराव पाटील, नितीन शिंदे, तुकाराम खाडे, राजेंद्र भोसले, दिलीप पाटील, राजेंद्रप्रसाद बाबर, अस्लम मुल्ला, छबूताई यादव, रेखा कदम, सचिव सुजाता सोनावणे, लिपिक नीलेश भोसले उपस्थित होते. या सभेला ऑनलाईनद्वारे राजेंद्र चांदेकर, विठ्ठल जाधव, देविदास सावळकर, सुनील ढेबे, शरद पवार, बाळासाहेब घोलप, रवींद्र पोळ आदी सभासद उपस्थित होते.

टीप :

बातमी दोन कॉलममध्ये घ्यावी, जाहिरात आणि दीपोत्सव घेतात.

.........................................................................

Web Title: Zilla Parishad fourth class credit union meeting in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.