पाणीदार गावासाठी जिल्हा परिषदेचे पाठबळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:05 PM2019-05-13T12:05:32+5:302019-05-13T12:06:56+5:30

सातारा : माळ, शिवार पाणीदार करण्यासाठी गावेच्या गावे जलसंधारण चळवळीत उतरलीत. अशाचप्रकारे चिलेवाडीनेही वॉटर कपमध्ये सहभाग घेत काम सुरू ...

Zilla Parishad support for watery villages! | पाणीदार गावासाठी जिल्हा परिषदेचे पाठबळ !

पाणीदार गावासाठी जिल्हा परिषदेचे पाठबळ !

Next
ठळक मुद्देपाणीदार गावासाठी जिल्हा परिषदेचे पाठबळ !चिलेवाडीत महाश्रमदान : अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग

सातारा : माळ, शिवार पाणीदार करण्यासाठी गावेच्या गावे जलसंधारण चळवळीत उतरलीत. अशाचप्रकारे चिलेवाडीनेही वॉटर कपमध्ये सहभाग घेत काम सुरू केले आहे. या कामाला आपलेही पाठबळ मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी महाश्रमदानासाठी हजेरी लावत हाती टिकाव, खोरे घेतले.

राज्यात गेल्या चार वर्षांपासून पाणी फौंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झालीय. या स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारण आणि मनसंधारणाचे मोठे काम होऊ लागले आहे. जलसंधारणामुळे पासाळ्यात माळ, शिवारात पाणी साठून टंचाई दूर होऊ लागलीय. तसेच अनेक गावे पाणीदारही झाली आहेत. त्यामुळेच ही चळवळ आता पाणीदार म्हणून पुढे आली आहे.

या चळवळीत ग्रामस्थ सहभाग घेतात. तसेच अधिकारी आणि अभिनेतेही सहभागी होऊन लोकांचा उत्साह वाढवत आहेत. अशाचप्रकारे सातारा जिल्हा परिषदेने कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडीत महाश्रमदानाचे आयोजन केले होते.

महाश्रमदानादिवशी चिलेवाडीत सकाळी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे (ग्रामपंचायत) आदींसह गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित झाले.

त्यानंतर श्रमदान होणाऱ्या ठिकाणी सर्वजण गेले. कोणी हातात टिकाव घेतला तर कोणी खोरे, पाटी घेतली. जवळपास चार तास महाश्रमदानाचे काम करण्यात आले. उन्हाची तीव्रता वाढत असतानाही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चिलेवाडी गावाच्या पाणीदार चळवळीसाठी हातभार लावला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडतरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यामुळे श्रमकर्त्यांचा उत्साहही वाढला.

 

Web Title: Zilla Parishad support for watery villages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.