जिल्हा परिषद जपणार ‘माती अन् माणसं’

By admin | Published: March 25, 2015 11:29 PM2015-03-25T23:29:33+5:302015-03-26T00:02:30+5:30

अंदाजपत्रकाला मंजुरी : समाजकल्याण, ‘जलयुक्त शिवार’ला झुकते माप

Zilla Parishad will organize 'Mati aan Manson' | जिल्हा परिषद जपणार ‘माती अन् माणसं’

जिल्हा परिषद जपणार ‘माती अन् माणसं’

Next

सातारा : जिल्हा परिषदेच्या २०१५-१६ साठीच्या २५ कोटी ५४ लाखांच्या अंदाजपत्रकाला बुधवारी झालेल्या सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. अर्थ व शिक्षण सभापती अमित कदम यांनी हा अर्थसंकल्प मांडला. जिल्ह्यासाठी वैविध्यपूर्ण योजनांचा या अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. या अंदाजपत्रकामध्ये समाजकल्याण विभागाला झुकते माप देण्यात आले आहे.
अंदाजपत्रकाच्या मंजुरीसाठी सभा आयोजित केली होती. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांची प्रमुख उपस्थिती होती.
या अंदाजपत्रकात शिक्षण विभागाकरिता २०० लाख, कृषी विभागाकरिता १०० लाख, आरोग्य विभागाकरिता ८० लाख, समाजकल्याण विभागाकरिता २८५.९१ लाख, महिला व बालकल्याण विभागाकरिता १०४.४२ लाख,
अशी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेकडील कृषी, लघु पाटबंधारे तथा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शासनाने जाहीर केलेल्या जलयुक्त शिवाराकरिता जास्तीचा निधी देऊन जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत निर्माण करून शेतीसाठी मुबलक पाणीसाठा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद काम करीत असल्याचेही सभापती अमित कदम यांनी सांगितले.
प्राथमिक शिक्षण, आरोग्य, कृषी विकास या बाबींवर जिल्हा परिषदेने जास्त भर दिला असून, आगामी वर्षात अनेक नवनवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील जनतेचे जीवन अधिक सुखकर होण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचेही अमित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

विरोधकांचा गोंधळ...पेल्यातले वादळ!
जिल्हा परिषद सदस्यांना अंदाजपत्रकाच्या प्रती मिळणे आवश्यक होते; पण अनेक सदस्यांना त्या मिळाल्या नसल्याने आयोजित केलेली सभा रद्द करावी, अशी मागणी जयवंत जगताप यांनी केली; परंतु त्यांच्या मागणीला विरोधी बाकावरील सदस्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने सभा पुढे सुरू राहिली.

Web Title: Zilla Parishad will organize 'Mati aan Manson'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.