पदाधिकारी-अधिकारी समन्वयामुळेच जिल्हा परिषदेचा नावलौकिक : कबुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:46 AM2021-09-24T04:46:25+5:302021-09-24T04:46:25+5:30
सातारा : ‘जिल्ह्यात दीड वर्षांपासून कोरोनाचं संकट आहे. या संकटात जिल्हा परिषदेचे अधिकारी पुढे होऊन काम करीत आहेत. त्याचबरोबर ...
सातारा : ‘जिल्ह्यात दीड वर्षांपासून कोरोनाचं संकट आहे. या संकटात जिल्हा परिषदेचे अधिकारी पुढे होऊन काम करीत आहेत. त्याचबरोबर पदाधिकारी आणि अधिकारी समन्वयाने काम करीत असल्यानेच जिल्हा परिषदेचा नावलौकिक होत चालला आहे,’ असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा परिषदेतून बदली झालेले व नव्याने पदभार स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्ष कबुले बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, समान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, पाणी व स्वच्छता विभागाचे किरण सायमोते, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण समिती सभापती कल्पना खाडे यांच्यासह अधिकारी व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात बदली झालेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी रणजित ओतारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेत बदलीवर आलेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, महिला व बालकल्याणच्या रोहिणी ढवळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुणकुमार दिलपाक यांचे स्वागत करण्यात आले.
संतोष धोत्रे म्हणाले, ‘जिल्हा परिषदेत चांगल्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे दुष्काळ, पाणटंचाईच्या काळात चांगले काम करता आले. जिल्हा परिषदेला लाभलेले पदाधिकारी आणि अधिकारी एकत्र येऊन काम करतात. त्यामुळेच जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढला आहे. येथील कामातून आलेल्या अनुभवावर सोलापूरमध्ये काम करणार आहे.’
अविनाश फडतरे म्हणाले, ‘सातारा जिल्हा परिषदेत काम करताना वरिष्ठांकडून खूप काही शिकता आले. काम केल्याचा आनंद मिळाला. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्यानेच खूप चांगले काम करता आले.
यावेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर, सुषमा देसाई, भीमराव पाटील, आदींनीही मनोगत व्यक्त केले.
चौकट :
यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने काम...
कोरोना संकटाची जबाबदारी अधिकारी, तसेच पदाधिकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पेलली. जीवाची पर्वाही केली नाही. यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले. जिल्हा परिषदेचे काम दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने चालते. एखादे काम कमी झाले तरी चालेल, पण कोठेही गालबोट लागता कामा नये, अशी भूमिका राहिली आहे. समन्वयाने काम करीत असल्यानेच जिल्हा परिषदेचा दिल्लीपर्यंत नावलौकिक झाला आहे, असे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी स्पष्ट केले.
...........
फोटो दि.२३सातारा झेडपी सत्कार फोटो मेल ...
फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेत अविनाश फडतरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते उपस्थित होते.
..........................................................