झेडपीची बिले आॅनलाईन होणार !
By admin | Published: April 5, 2017 11:15 PM2017-04-05T23:15:41+5:302017-04-05T23:15:41+5:30
राजेश पवार; अर्थ खात्यातील खाबुगिरीला बसणार चाप
सातारा : ‘जिल्हा परिषदेच्या अर्थ खात्याच्या माध्यमातून देण्यात येणारी सर्व कामांची बिले ही आॅनलाईन पद्धतीने दिली जाणार आहेत,’ अशी माहिती अर्थ व शिक्षण सभापती राजेश पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अर्थ खात्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या बिलांबाबत तक्रारी वाढत असल्याचे पाहून पवार यांनी बुधवारी आपला हा निर्णय जाहीर केला. अर्थ व शिक्षण सभापतिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पवार यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम त्यांनी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
अर्थ विभागाचे प्रशासन ‘क्लिन’ करण्यासाठी त्यांनी नवे धोरण हाती घेतल्याची माहिती दिली. अर्थ खात्याच्या माध्यमातून मिळणारी विविध कामांची बिले उशिरा मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)