जलसंधारणासाठी झेडपीचं पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:09 PM2019-05-12T23:09:36+5:302019-05-12T23:09:41+5:30
सातारा : माळ, शिवार पाणीदार करण्यासाठी गावेच्या गावे जलसंधारण चळवळीत उतरलीत. अशाचप्रकारे चिलेवाडीनेही वॉटर कपमध्ये सहभाग घेत काम सुरू ...
सातारा : माळ, शिवार पाणीदार करण्यासाठी गावेच्या गावे जलसंधारण चळवळीत उतरलीत. अशाचप्रकारे चिलेवाडीनेही वॉटर कपमध्ये सहभाग घेत काम सुरू केले आहे. या कामाला आपलेही पाठबळ मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी महाश्रमदानासाठी हजेरी लावत हाती टिकाव, खोरे घेतले.
राज्यात गेल्या चार वर्षांपासून पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झालीय. या स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारण आणि मनसंधारणाचे मोठे काम होऊ लागले आहे. जलसंधारणामुळे पावसाळ्यात माळ, शिवारात पाणी साठून टंचाई दूर होऊ लागलीय. तसेच अनेक गावे पाणीदारही झाली आहेत. त्यामुळेच ही चळवळ आता पाणीदार म्हणून पुढे आली आहेत. या चळवळीत ग्रामस्थ सहभाग घेतात. तसेच अधिकारी आणि अभिनेतेही सहभागी होऊन लोकांचा उत्साह वाढवत आहेत. अशाचप्रकारे सातारा जिल्हा परिषदेने कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडीत महाश्रमदानाचे आयोजन केले
होते.
महाश्रमदानादिवशी चिलेवाडीत सकाळी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे (ग्रामपंचायत) आदींसह गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित झाले. त्यानंतर श्रमदान होणाºया ठिकाणी सर्वजण गेले. कोणी हातात टिकाव घेतला तर कोणी खोरे, पाटी घेतली. जवळपास चार तास महाश्रमदानाचे काम करण्यात आले.
उन्हाची तीव्रता वाढत असतानाही अधिकारी, कर्मचाºयांनी चिलेवाडीच्या पाणीदार चळवळीसाठी हातभार लावला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडतरे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
श्रमदानासाठी
पूर्व नियोजन...
जिल्हा परिषदेच्या वतीने चिलेवाडीत महाश्रमदान करण्यात येणार होते. त्यासाठी पूर्व नियोजन करण्यात आलेले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे यांच्यासह इतर अधिकाºयांनी बैठका घेतल्या होत्या. त्यानुसार नियोजन करून महाश्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे श्रमदानात अधिकारी आणि कर्मचारीही सहभागी झाले होते.