३० टक्के भारतीय महिला करतात पॉर्न साइट सर्च, पॉर्नहबचा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 12:35 PM2018-12-14T12:35:21+5:302018-12-14T12:38:28+5:30
जगातली सर्वात मोठी पॉर्न वेबसाइट pornhub नुसार २०१८ मध्ये त्यांच्या वेबसाइटवर एकूण ३३.५ बिलियन म्हणजे ३ हजार ३०० कोटी लोकांनी भेट दिली.
जगातली सर्वात मोठी पॉर्न वेबसाइट pornhub नुसार २०१८ मध्ये त्यांच्या वेबसाइटवर एकूण ३३.५ बिलियन म्हणजे ३ हजार ३०० कोटी लोकांनी भेट दिली. पॉर्नहबने दिलेल्या आकडेवारीनुसार, ही आकडेवारी २०१७ च्या तुलनेत ५ बिलियनने अधिक आहे. प्रत्येक दिवसाच्या आकडेवारीबाबत सांगायचे तर या साइटवर सरासरी ९२ मिलियन म्हणजे ९ कोटी २० लाख लोक भेट देतात. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, दररोज या साइटवर येऊन पॉर्न कन्टेट बघणाऱ्यांची संख्या पोलंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही देशांची लोकसंख्या एकत्र केल्यावरही जास्त आहे.
तिसऱ्या क्रमांकावर आहे भारत
pornhub च्या टॉप यूजरमध्ये अमेरिकेतील लोकांचा पहिला क्रमांक लागतो. इथूनचा त्यांना सर्वात जास्त ट्रॅफिक मिळतं. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर यूके आणि तिसऱ्या स्थानावर भारताचा क्रमांक लागतो. म्हणजे पॉर्नहब या वेबसाइटवर जाऊन कन्टेट सर्च करण्यात भारताचा जगभरात तिसरा क्रमांक लागतो. चौथ्या क्रमांकावर जपान आणि पाचव्या क्रमांकावर कॅनडा हे देश आहेत. गेल्यावर्षी म्हणजेच २०१७ मध्येही भारत या यादीत तिसऱ्या क्रमांकावरच होता.
३० टक्के महिला बघतात पॉर्न
मोफत ऑनलाइन पॉर्न कन्टेट बघण्याबाबत महिलाही पुरुषांच्या जास्त मागे नाहीयेत. एकीकडे ७० टक्के भारतीय पुरुष इंटरनेटवर पॉर्न कन्टेट बघतात तर दुसरीकडे ३० टक्के भारतीय महिला अशा आहेत, ज्या इंटरनेटवर पॉर्न कन्टेट बघतात. गेल्यावर्षी म्हणजे २०१७ मध्ये ही आकडेवारी २६ टक्के इतकी होती. ती वाढून आता ३० टक्के झाली आहे. जगभरातील आकडेवारीबाबत सांगायचं तर एकूण २९ टक्के महिला पॉर्नहब साइटला भेट देतात.
स्टॉर्मी डॅनिअलला सर्वात जास्त सर्च
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसोबत नातं असल्याच्या वादात सापडल्यानंतर पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनिअल ही सर्वात जास्त सर्च केली गेलेली पॉर्नस्टार ठरली आहे. भारतीयांच्या पसंतीचं सांगायचं सनी लिओनी अजूनही त्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये कायम आहे. तर दुसऱ्या स्थानावर मिया खलिफा आहे.
किती वेळ बघतात पॉर्न
पॉर्नहबवर भेट दिल्यावर एक यूजर सरासरी १० मिनिटे १३ सेकंद वेळ घालवतात. याबाबतीत फिलिपीन्सचे लोक पहिल्या क्रमांकावर आहेत. येथील प्रत्येक यूजर हा साइटवर स१३ मिनिटे ५० सेकंद इतका वेळ घालवतात. तर भारतीय यूजर सरासरी ८ मिनिटे २३ सेकंद इतका वेळ घालवतात.