सावधान! कंडोमही नाही १०० टक्के सुरक्षित!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 04:12 PM2019-06-11T16:12:06+5:302019-06-11T16:12:16+5:30
सुरक्षित शारीरिक संबंधासाठी कंडोम हाच सर्वात चांगला पर्याय मानला जातो. याचा वापरही सोपा असल्याने याला सर्वाधिक लोकप्रियता आहे.
सुरक्षित शारीरिक संबंधासाठी कंडोम हाच सर्वात चांगला पर्याय मानला जातो. याचा वापरही सोपा असल्याने याला सर्वाधिक लोकप्रियता आहे. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चने अनेकांची झोप उडवली आहे. या रिसर्चमध्ये मोठ्या ब्रॅन्डचेही पाच टक्के कंडोम फेल झाले आहेत. ही आकडेवारी चांगलीच धडकी भरवणारी आहे. याने लैंगिक रोग आणि नको असलेली गर्भधारणा होण्याचा धोका अधिक वाढतो.
लीकेजचा धोका
द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षित लैंगिक संबंध आणि नको असलेल्या गर्भधारणेपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही सुद्धा कंडोमलाच योग्य पर्याय मानत असाल तर वेळीच सावध व्हा. नुकत्याच झालेल्या एका टेस्टमध्ये ५ टक्के कंडोम फेल झाले आहेत. यात जास्तीत जास्त प्रकरणे कंडोम प्रेशर पेलू न शकणे आणि लीकेजचे आहेत.
पाच टक्के कंडोम झाले फेल
कंडोमची गुणवत्तेची तपासणी आणि याच्याशी संबंधित गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी एक आयटीआय फाइल करण्यात आली होती. यानंतर एक महिना देशभरातील वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या ४११ कंडोमचे सॅम्पल घेण्यात आले. सॅम्पल सेंट्रल ड्रग टेस्टिंग लॅबने स्वत: घेतले होते. त्यातून धक्कादायक बाब समोर आली. ४११ सॅम्पलपैकी २२ कंडोम म्हणजे ५ टक्के कंडोम टेस्टमध्ये फेल झालेत. या टेस्टचे आदेश आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने दिले होते.
क्वालिटी चेक होऊ शकत नाही
तज्ज्ञांचं मत आहे की, 'इतक्या मोठ्या प्रमाणावर कंडोमची टेस्ट फेल होणं हे मोठं प्रकरण आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता सरकारने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले पाहिजे'. एका दुसऱ्या आरटीआय कार्यकर्त्यांनी सांगितले की, याने आजार पसरण्याच्या शक्यतेसोबतच फॅमिली प्लॅनिंग सुद्धा प्रभावित होऊ शकते. तर एक डॉक्टर म्हणाले की, यामागे टेस्ट सेंटरची कमतरता असणे हेही एक कारण आहे. देशात रोज लाखो कंडोमचा वापर होतो. पण यांची क्वालिटी चेक करण्यासाठी केवळ एकच संस्था आहे.