पहाटेच्यावेळी शरीरसंबंध ठेवणं फायद्याचं, की...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 05:00 PM2018-10-25T17:00:34+5:302018-10-25T19:55:02+5:30
शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कोणती वेळ योग्य याबाबत वेगवेगळी मते सांगितली जातात. पण तज्ज्ञ सांगतात की, पहाटे शारीरिक संबंध प्रस्थापित करणं अधिक चांगलं असतं.
शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कोणती वेळ योग्य याबाबत वेगवेगळी मते सांगितली जातात. पण तज्ज्ञ सांगतात की, पहाटे शारीरिक संबंध प्रस्थापित करणं अधिक चांगलं असतं. कारण याने पती-पत्नी दोघांनाही परमोच्च आनंद मिळतो आणि आरोग्यासाठीही हे फायदेशीर ठरतं. याने केवळ शरीराचं आरोग्यच नाही तर फर्टिलीटीही वाढते. अमेरिकेतील एका शोधानुसार, पती-पत्नी जर आठवड्यातून तीनदा पहाटे शारीरिक संबंध ठेवत असतील तर त्यांना हार्ट अटॅकचा धोका फार कमी असतो. पहाटे शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने फील गुड हार्मोन ऑस्कीटोसिन रिलीज होतात. ज्याने तुम्हाला आनंद आणि आराम मिळेल.
जाणून घ्या हे ५ फायदे
फिटनेस चांगली राहते
पहाटे शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याने दिवसभर तुम्हाला ताजतवाणं जाणवेल आणि तुम्ही फिट राहाल. पहाटे शारीरिक संबंधादरम्यान शरीरातून निघणाऱ्या केमिकल्स तुम्हाला संतुष्टी मिळेल. ज्यामुळे तुम्ही खूश केवळ आनंदीच नाही तर फिटही राहाल.
आजारांना ठेवा दूर
पहाटे शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरात आयजीएची निर्मिती अधिक होते. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. आयजीएचं प्रमाणा त्या लोकांमध्ये अधिक आढळलं, जे आठवड्यातून दोन-तीनदा शारीरिक संबंध प्रस्थापित करतात.
मायग्रेन आणि सांधीवात ठेवा दूर
पहाटे शारीरिक संबंध ठेवल्याने मायग्रेनच्या आणि इतरही शारीरिक वेदना दूर होतील. शरीर शांत होऊन तुम्हाला आरामही मिळतो. तसेच याने सांधीवाताचा त्रासही कमी होतो.
ब्लड सर्कुलेशन आणि नर्व सिस्टीम
पहाटे शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशनमध्ये चांगला सुधार होतो आणि रक्तदाब कमी होतो.
हाही फायदा
पहाटे आपला मेंदू शांत असतो. त्यावेळी कोणतीही काळजी किंवा चिंता डोक्यात सुरु नसते. त्यावेळी पूर्ण लक्ष हे संभोगावर केंद्रीत करता येऊ शकतं.