लैंगिक जीवन : कॅलरी बर्न करण्यासोबतच 'हे' आहेत ऑर्गॅज्मचे फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 03:59 PM2019-01-17T15:59:24+5:302019-01-17T16:00:45+5:30
तुम्ही मान्य करा अथवा नका करु पण चांगल्या लैंगिक क्रियेसाठी ऑर्गॅज्म फारच गरजेचं आहे.
तुम्ही मान्य करा अथवा नका करु पण चांगल्या लैंगिक क्रियेसाठी ऑर्गॅज्म फारच गरजेचं आहे. खासकरुन महिलांसाठी. कारण त्यांना परमोच्च आनंद मिळवण्यासाठी म्हणजेच ऑर्गॅज्म मिळवण्यासाठी फार वेळ लागतो. ज्याप्रकारे शारीरिक संबंध आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे, त्याचप्रमाणे ऑर्गॅज्मचेही अनेक फायदे आहेत.
काय आहेत ऑर्गॅज्मचे फायदे?
ऑर्गॅज्मनंतर शरीरातून ऑक्सिटोसिन रिलीज होतात, यांना लव्ह हार्मोन्स म्हटलं जातं. जर तुम्हाला कोणत्या प्रकारचा स्ट्रेस असेल किंवा तुम्ही तणावात असाल तर ऑक्सिटोसिन रिलीज झाल्यावर तुम्हाला चांगलं वाटतं.
ऑर्गॅज्म दरम्यान डोपामाइन नावाचे हार्मोन्सही रिलीज होतात. जे ऑक्सिटोसिनसोबत मिळून शरीराची मदत करतात. हे दोन हार्मोन्स भूक कंट्रोल करण्यासाठी मदत करतात.
ऑर्गॅज्मनंतर शरीरातून रिलीज होणाऱ्या हार्मोन्समध्ये इन्डॉरफिन हेही असतात. ज्याला हॅपी हार्मोन म्हटलं जातं आणि या हार्मोनच्या मदतीनेच व्यक्तीला रिलॅक्स वाटतं. हेच कारण आहे की, चांगल्या ऑर्गॅज्मचा अनुभव घेतल्यावर व्यक्तीला सर्वात चांगली झोप लागते.
काही रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ऑर्गॅज्ममधून तुम्ही जवळपास २०० कॅलरी बर्न करु शकता. अशात तुम्ही एखाद्या दिवशी जिमला जाऊ शकला नाही तर ऑर्गॅज्मच्या माध्यमातून तुम्ही कॅलरी बर्न करु शकता आणि फिट राहू शकता.
शारीरिक संबंध आणि ऑर्गॅज्म महिलांच्या शरीरात असलेले एस्ट्रोजेन स्तराला कायाम ठेवण्यास मदत करतं. एस्ट्रोजेन चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ देत नाही. सोबतच तुमची त्वचा मॉइश्चराइज्ड आणि हायड्रेटेड राहते.