लैंगिक जीवन : मद्यसेवनाने खरंच स्टॅमिना वाढतो का? जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 03:15 PM2018-12-15T15:15:13+5:302018-12-15T15:15:55+5:30
अनेक लोक असं मानतात की, मद्यसेवन केल्यावर शारीरिक संबंध ठेवल्याने जास्त आनंद मिळतो. पण तज्ज्ञ सांगतात की, हा केवळ एक भ्रम आहे.
अनेक लोक असं मानतात की, मद्यसेवन केल्यावर शारीरिक संबंध ठेवल्याने जास्त आनंद मिळतो. पण तज्ज्ञ सांगतात की, हा केवळ एक भ्रम आहे. कारण मद्यसेवन केल्यावर व्यक्तीचे इंद्रिय शांत होतात आणि यामुळे व्यक्तीला आधीच झोप येऊ लागते. अशात शारीरिक संबंधाआधी मद्यसेवन केल्याने केवळ थकवाच जाणवतो असे नाही तर झोपही येते.
शुक्राणूंची संख्या कमी होते
जास्त प्रमाणात मद्यसेवन केल्यावर किंवा प्रमाणापेक्षा जास्त मद्यसेवन केल्यावर शुक्राणूंची संख्या कमी होण्याची शक्यता असते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, मद्यसेवनामुळे शुक्राणुंवर वाईट प्रभाव पडतो. शुक्राणूंची गुणवत्ता याने खालावली जाते. तसेच यामुळे शुक्राणूंचं संतुलनही बिघडतं.
लैंगिक जीवनाला धोका
नशेच्या अवस्थेत शारीरिक संबंध ठेवताना अनेकदा लोक अनैसर्गिक गोष्टीही करु लागतात. याने संक्रमण होण्याचा धोका, गर्भधारणा होणे आणि नातं तुटणं या गोष्टीही होऊ शकतात. तसेच आणखी काही आजारांचा सामना करावा लागू शकतो. महिलामध्ये मद्यसेवनामुळे मासिक पाळीत अडचणी येऊ शकतात. त्यांच्या हार्मोन्सचं संतुलन बिघडू शकतं. त्यासोबतच मद्यसेवनामुळे लिवर खराब होतं आणि याचा पचनक्रियेवर प्रभाव पडतो. म्हणजे एकंदर काय तर जर आरोग्यच चांगलं राहिलं नाही तर तुम्ही लैंगिक जीवनाचा चांगलं आनंद घेऊ शकणार नाही.
उत्तेजना कमी होते
जास्त प्रमाणात मद्यसेवन केल्याने गुप्तांगाची उत्तेजना किंवा ताठरता कमी होते. त्याचप्रमाणे महिलेने मद्यसेवन केले असेल तर त्यांनाही परमोच्च आनंद मिळणे कठीण होईल. त्यामुळे दोघेही या गोष्टीचा पुरेसा आनंद घेऊ शकत नाही.