लैंगिक जीवन : अद्वितीय आनंदासाठी वातावरणही गरजेचं!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 03:54 PM2018-11-23T15:54:30+5:302018-11-23T15:55:53+5:30
शारीरिक संबंध हा वैवाहिक जीवनाचा आधार आहे. मात्र एका काळानंतर या गोष्टीतील उत्साह अनेकांमध्ये कमी होतो आणि याचा दबाव वाढू लागतो.
(Image Credit : www.tworivershealth.ca)
शारीरिक संबंध हा वैवाहिक जीवनाचा आधार आहे. मात्र एका काळानंतर या गोष्टीतील उत्साह अनेकांमध्ये कमी होतो आणि याचा दबाव वाढू लागतो. जे यात सहभागी असतात ते लोक मानसिक रुपाने संतुष्ट नसतात. पण वेगवेगळ्या शोधांमधून हे समोर आले आहे की, जी जोडपी आनंदी जीवन जगत असतात, ते एकमेकापासून शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर संतुष्ट असतात.
काय असतं कारण?
एकमेकांपासून शारीरिक आणि मानसिक रुपाने संतुष्ट असण्यासाठी दोघांनी केवळ एकमेकांप्रति आकर्षित असून चालत नाही. तर एकमेकांप्रति असलेलं हे आकर्षण सतत कायम रहावं हे गरजेचं आहे. आतापर्यंत हेच मानलं जात होतं की, महिलांची बाहेरील सुंदरता आणि पुरुषांची क्षमता याची शारीरिक संबंधात मोठी भूमिका असते. परंतु किंसले इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या एका शोधातून समोर आले आहे की, शारीरिक संबंधात एकमेकांसोबत सहज असण्यासोबतच वातावरण मोठी भूमिका बजावतं.
वातावरणाचा पडतो प्रभाव
या शोधादरम्यान ५० टक्के महिलांना हे मान्य केलं की, शारीरिक संबंधादरम्यान अनुकूल वातावरण नसल्याने त्या परमोच्च आनंद मिळवू शकत नाहीत. महिलांनी हेही मान्य केलं की, पुरुषांचे थंडे पाय त्यांच्यासाठी जास्त त्रासदायक ठरतात. या शोधाचे मुख्य डॉ. होल्सटेज म्हणाले की, शारीरिक संबंधावेळी वातावरणही फार महत्त्वाचं असतं. जर रुमचं तापमान अनुकूल असेल तर लैंगिक क्रियेचा अधिक आनंद घेता येतो.
आनंद तडजोड नसतो
शारीरिक संबंध ठेवताना वेगवेगळ्या पोजिशनची काळजी घेणेही गरजेचं असतं. काही पोजिशन अशा असतात, ज्यात पुरुषांना तर आकर्षण वाटतं. पण महिलांना सहज वाटत नाही. त्यांना काहीना काही अडचण होते. शोधात सहभागी महिलांनी सांगितले की, जोडीदाराच्या आनंदासाठी त्यांनी अनेकदा अशा पोजिशनला प्रतिसाद दिला. पण त्यांना त्यातून आनंद मिळाला नाही.
वेळ घ्या
या शोधात सहभागी महिलांपैकी केवळ पन्नास टक्के महिला म्हणाल्या की, त्या १० मिनिटे किंवा त्यापेक्षाही कमी वेळेत परमोच्च सुखापर्यंत पोहोचतात. सेक्स मेडिसीनच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, शारीरिक संबंधात घाई गडबड करुन पुरुष संतुष्ट होतात, पण महिलांना पूर्ण आनंद मिळू शकत नाही. अशात पुरुषांची ही जबाबदारी असते की, त्यांनी एकट्याचा विचार न करता जोडीदारालाही आनंदाच्या या प्रवासात जास्त वेळासाठी सोबत घेऊन जावे.