लैंगिक जीवन : 'हे' पदार्थ खाऊन शारीरिक संबंध ठेवाल तर मूड होऊ शकतो खराब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 03:30 PM2019-07-03T15:30:36+5:302019-07-03T15:32:09+5:30
अनेक पदार्थ असे असतात ज्याने तुम्हाला कामेच्छा वाढवण्यास मदत मिळते. त्यात दूध, बदाम, केसर आणि आक्रोड इत्यादींचा समावेश होतो.
अनेक पदार्थ असे असतात ज्याने तुम्हाला कामेच्छा वाढवण्यास मदत मिळते. त्यात दूध, बदाम, केसर आणि आक्रोड इत्यादींचा समावेश होतो. पण काही पदार्थ हे यांच्या विरूद्ध काम करतात. याने शारीरिक संबंधावेळी तुमचा मूड खराब होऊ शकतो. चला जाणून घेऊ अशाच काही पदार्थांबाबत जे खाल्ल्यावर तुम्हाला शारीरिक संबंधात अडचण येऊ शकते.
फ्रेंच फ्राइज
फ्रेंच फ्राइजमध्ये ट्रान्स-फॅट असत, ज्यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोन आणि सर्कुलेशन प्रभावित होतं. सोबतच फ्राइजमध्ये मिठाचं प्रमाणही अधिक असतं, ज्यामुळे पुरूषांना इरेक्शनमध्येही अडचण येऊ शकते.
मद्यसेवन
मद्यसेवनामुळे मेलाटोनिन हार्मोन्स अधिक रिलीज होतात, यांनाच स्लीप हार्मोन्स म्हणून ओळखलं जातं. लोक भलेही उत्तेजना वाढण्यासाठी किंवा स्टॅमिनासाठी मद्यसेवन करत असतील, पण याने इरेक्टाइल डिस्फंक्शन आणि प्रीमॅच्युअर इजॅक्यूलेशनसारखी समस्या निर्माण होऊ शकते.
कॉफी
काही लोकांचं असं मत आहे की, कॉफीमुळे उत्तेजना वाढते, तर असंही म्हटलं जातं की, फार जास्त कॅफीनमुळे तुमचं कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढतं, जो एक सेक्स हार्मोन आहे. एक्सपर्ट्सनुसार, जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने शरीर रिलॅक्स होऊ शकत नाही आणि तुमचं शारीरिक संबंध ठेवण्याचं मन होणार नाही.
मिंट
किस करण्यापूर्वी जास्तीत जास्त लोक हे मिंट खाणं पसंत करतात. पण रिसर्चनुसार, याने तुमची एनर्जी डाऊन होऊ शकते किंवा तुमचा मूड खराब होऊ शकतो. तेच च्युइंगम चावताना तोंडात हवा जाऊन गॅसची समस्याही होऊ शकते.
फ्लॉवर किंवा ब्रोकलीसारख्या भाज्या
फ्लॉवर आणि ब्रोकली या भाज्या मिथेन रिलीज करणाऱ्या असतात. या भाज्या चांगल्या शिजवून खाल्ल्या तर चांगलं होतं. नाही तर गॅसची समस्या होते. असं झालं तर शारीरिक संबंधावेळी तुम्हाला समस्या होऊ शकते.