लैंगिक जीवन : बेडरूममध्ये 'या' चुका टाळाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 02:41 PM2018-12-29T14:41:45+5:302018-12-29T14:42:31+5:30
अनेकदा असं होतं की, एक व्यक्ती त्याच्या जोडीदाराच्या बेडरुममधील त्याच त्याच वागण्याला कंटाळेलेले असतात.
अनेकदा असं होतं की, एक व्यक्ती त्याच्या जोडीदाराच्या बेडरुममधील त्याच त्याच वागण्याला कंटाळेलेले असतात. खाजगी क्षणांमध्ये काहीच नाविन्य राहिलं नाही तर दोघांचंही कशात मन लागत नाही शिवाय आनंदही मिळत नाही. अनेकदा बेडरुममध्ये दोघांपैकी एक व्यक्ती अशा काही चुका करत असतात ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या जोडीदाराच्या लैंगिक जीवनातील आनंद दूर झालेला असतो. त्यामुळे चला जाणून घेऊ बेडरुममध्ये कोणत्या चुका टाळाव्यात.
पतीने घ्यावा पुढाकार
शारीरिक संबंधासाठी पुढाकार हे तर पुरुषांचं काम आहे म्हणून महिला यासाठी कधी पुढाकारच घेत नाहीत. त्यांना असं वाटत असतं की, शारीरिक संबंध ठेवताना त्यांना काय हवं हे जोडीदारानेच ओळखावं किंवा समजून घ्यावं. त्या त्यांच्या मनातील गोष्टी बोलून दाखवत नाहीत. पण हे फार चुकीचं आहे. तुम्हाला काय हवंय हे जोपर्यंत तुम्ही सांगणार नाहीत तोपर्यंत जोडीदाराला कसं कळणार? त्यामुळे यावर मोकळेपणाने बोलणे फायद्याचे ठरते.
मनातलं समजून घेत नाही
अनेकदा पुरुष शारीरिक संबंधात घाई करतात. मात्र महिलांची इच्छा काही वेगळीच असते. पुरुष फोरप्लेमध्ये जास्त वेळ घालवत नाही, पण महिलांसाठी फोरप्ले जास्त गरजेचा असतो. जर तुमच्या पार्टनरला ही बाब माहिती नसेल तर त्यांना सांगा की शारीरिक संबंध ठेवण्याआधी फोरप्ले तुमच्यासाठी किती आनंददायी असतो. फोरप्ले दरम्यान काही नवीन करा. तुम्हाला काय आवडतं किंवा काय इच्छा आहे ते सांगा.
शरीराप्रति हीन भावना
महिला कधीही हे मान्य करत नाहीत, पण त्या त्यांच्या शरीराबाबत हीनभावनेने ग्रस्त असतात. काही महिला या शारीरिक संबंधादरम्यान त्यांचे काही अंग लपवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेकदा पुरुष चिडतात देखील.
नेहमी नाही म्हणणे
शारीरिक संबंधासाठी अनेकदा पुरुष तयार असतात, पण महिलाच नाही म्हणतात. पण नेहमी असं करण योग्य नाही. सुखी लैंगिक जीवनासाठी दोघांचीही तयारी समान हवी. तरच दोघांचं वैवाहिक नातं आणखी घट्ट होईल. काही अडचण असे किंवा नाही म्हणण्याला कारण असेल ते जोडीदाराला सांगा. ते न सांगता नकार देत राहिलात तर तुमच्यात वाद होण्याचाही धोका असतो.
शारीरिक संबंधानंतर व्यवहार
अनेकदा शारीरिक संबंधानंतर काही महिला गमतीने असं काही बोलतात ज्याचा राग पुरुषांना येतो. पण असं करणं योग्य नाही. हे लक्षात ठेवा की, शारीरिक संबंध हा वैवाहिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. यातून दोघांनाही आनंद मिळवायचा आहे.