लैंगिक जीवन : 'या' चुकांमुळे तुमचाच होऊ शकतो पोपट!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 04:15 PM2019-05-11T16:15:21+5:302019-05-11T16:22:48+5:30
जेव्हाही पार्टनरसोबत बेडवर इंटिमेट होत असता तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जेणेकरून काहीही चूक होऊन पार्टनरचा मूड खराब होऊ नये.
(Image Credit : rolereboot.org)
जेव्हाही पार्टनरसोबत बेडवर इंटिमेट होत असता तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जेणेकरून काहीही चूक होऊन पार्टनरचा मूड खराब होऊ नये. अनेकदा शारीरिक संबंधादरम्यान पार्टनरसोबत खास गोष्टी बोलल्यास मूड सेट होतो आणि हे दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकते. पण फार जास्त बोलणही नुकसानकारक ठरू शकतं. अशाच काही चुका खालीलप्रमाणे सांगता येतील.
एकच बाब पुन्हा पुन्हा विचारणे
(Image Credit : ScienceNordic)
शारीरिक संबंध ठेवत असताना पार्टनर कंफर्टेबल आहे किंवा नाही आणि त्यांचं लक्ष भरकटत तर नाहीये ना, त्यांना आनंद मिळतोय ना, काय करायला आवडेल या गोष्टी एकदा विचारल्या तर ठिक आहे. पण पुन्हा पुन्हा शारीरिक संबंध ठेवताना अशा गोष्टी विचारून तुम्ही पार्टनरचा मूड घालवू शकता. त्यामुळे अशा गोष्टी टाळा.
घाई करू नका
(Image Credit : Daily Mail)
कधी कधी घाईत ठेवलेले शारीरिक संबंध मूड चांगला करण्याच्या कामात येतात. पण जेव्हा तुमच्याकडे पुरेसा वेळ आणि मडू आहे. अशात जर तुम्ही तुमच्या ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचण्यासाठी घाई करत असाल किंवा फोरप्ले व पार्टनरवर लक्ष देण्याऐवजी केवळ अॅक्ट संपवण्याची घाई करत असाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते.
बॅकग्राऊंड आवाज
अनेकदा मूड सेटअप करण्याच्या उद्देशाने लोक बेडरूममध्ये हळू आवाजात रोमॅंटिक आणि मूड बनवणारी गाणी लावतात. पण हा बॅकग्राऊंडला येणारा आवाज तुम्हाला डिस्टर्ब करू शकतो. असंही होऊ शकतं की, तुम्ही क्लायमॅक्सच्या अगदी जवळ आहात आणि बॅकग्राऊंडच्या आवाजामुळे तुमचं लक्ष भरकटलं. अशावेळी तुम्हाला ऑर्गॅज्मचा आनंद मिळणार नाही.
जोरात आवाज करणे
सेक्शुअल अॅक्टदरम्यान थोडाफार आवाज काढणे किंवा निघणे उत्तेजना आणि आनंद वाढवण्यासाठी चांगला असतो. पण उगाच फार जास्त आवाज काढल्याने पार्टनरचा मूड खराब होऊ शकतो. इतकेच नाही तर कधीही शारीरिक संबंध ठेवताना फेक गोष्टी करू नका. जसे की, ऑर्गॅज्मचा अनुभव मिळाल्याचा आव आणू नये.