लैंगिक जीवन : बीट खाल्ल्याने सुटेल तुमचा 'तो' प्रॉब्लेम!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 03:40 PM2018-10-26T15:40:28+5:302018-10-26T16:55:02+5:30
लैंगिक जीवन सुकर होण्यासाठी आणि लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या औषधांचा वापर करतात.
लैंगिक जीवन सुकर होण्यासाठी आणि लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या औषधांचा वापर करतात. पण आपल्या रोजच्या खाण्यातीलही काही गोष्टींनी त्यांची लैंगिक क्षमता वाढू शकते हे अनेकांना माहीत नसतं. बीटाचे अनेक आरोग्यदायी फायदे तुम्ही वाचले-ऐकले असतील. याचा लैंगिक जीवन सुखी करण्यासाठीही फायदा होतो. बीट खाण्याने पुरुषांची लैंगिक संबंध ठेवण्याची क्षमता वाढते. पण याचा अर्थ असा नाही की, महिलांना याचा काहीच फायदा होत नाही.
काही शोधांनुसार, ज्याप्रकारे काही औषधं इरेक्टाइल डिसफंक्शनवर रामबाण उपाय ठरतात. तसंच काम बीट करतं. बीटामध्ये नायट्रेट हे तत्त्व असतं. हे पाणी, हवा आणि आहारातून मिळतं. ज्या लोकांना इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजेच शारीरिक संबंध ठेवताना कमजोरीची समस्या असेल, त्यांच्या शरीरात नायट्रिक ऑक्साइडचं प्रमाण वाढल्यास शारीरिक संबंधात सुधारणा होते.
तज्ज्ञांनुसार, बीट खाल्यानंतर त्यातील नायट्रेटस हा तोंडातील बॅक्टेरिया व्दारे नायट्राइटमध्ये रुपांतरित होतो. जेव्हा बीट चावल्यावर गिळलं जातं तेव्हा ते नायट्रिक ऑक्साइडमध्ये रुपांतरित होतं. हा गॅस रक्तप्रवाह चांगला करतो. नियमीतपणे बीट खाल्याने गुप्तांगातील रक्तपेशी आणखी मोकळ्या होतात आणि रक्तप्रवाह आणखी योग्यप्रकारे होऊ लागतो. याने इरेक्शन चांगल्या प्रकारे होतं आणि तुमचं लैगिक जीवन आणखी सुखद होतं. बीटात आढळणारं नाइट्रेट सप्लीमेंट तुमची लैंगिक क्षमता वाढवतं.
ब्रिटीश हर्ट फाऊंडेशननुसार, भाज्यांमध्ये जे नाइट्रेट असतं ते ब्लड-प्रेशर कमी करतं. २०१० मध्ये क्वीन मेरी यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासात ही बाब स्पष्ट झाली होती. अभ्यासकांनुसार, ५०० ग्रॅम बीट खाल्याने सहा तासात ब्लड प्रेशर कमी होतं. कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल पण ब्लड प्रेशरने लैंगिक जीवनावर वाईट प्रभाव पडतो.
बीटाचा आहारात असा करा समावेश
कच्चं - बीट हे तुम्ही कच्चं खाल्लं तरी याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. जेवताना याचे तुकडे करुन तुम्ही खाऊ शकता. याने पचनक्रियाही चांगली होते.
उकळून - जर तुम्हाला बीट कच्च खाणे पसंत नसेल तर ते उकळूनही तुम्ही खाऊ शकता. बीट उकळून त्यावर मीठ आणि लिंबू टाका आणि स्नॅक्स म्हणून तुम्ही हे खाऊ शकता. याने शरीरातील रक्तही वाढतं.
ज्यूस - जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बीटाचा ज्यूसही घेऊ शकता. बीटाच्या रसाने शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते.