लैंगिक जीवन : काय आहे बॉन्डेज प्ले? जाणून घ्या सगळं काही....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 03:36 PM2019-10-29T15:36:18+5:302019-10-29T15:37:05+5:30
आजकाल लोक लैंगिक जीवनाबाबत बरेच ओपन माइंडेड होऊ लागले आहते. तसेच लैंगिक जीवन एन्जॉय करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीही शोधत आहेत.
आजकाल लोक लैंगिक जीवनाबाबत बरेच ओपन माइंडेड होऊ लागले आहते. तसेच लैंगिक जीवन एन्जॉय करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीही शोधत आहेत. हेच कारण आहे की, गेल्या काही वर्षात करिज्जा, स्प्रेड इगल, सुपरमॅन आणि मिशनरीसारख्या कितीतरी पोजिशन्स आणि स्टाइलची लोकप्रियता वाढत आहे. अशीच एक स्टाइल आहे जी अलिकडे फार चर्चेत असते. ही स्टाइल सिनेमांमध्ये अधिक बघायला मिळते.
बीडीएसएम
या स्टाइलचं नाव आहे बॉन्डेज प्ले म्हणजे बीडीएसएम. म्हणजेड बॉन्डेज अॅन्ड डॉमिनेशन, डिलिप्लिन अॅन्ड सब्मिशन, सेडोमसोकिजम (वेदनांमधून आनंद मिळवणे...या शारीरिक संबंधाच्या अशा प्रक्रिया असतात, ज्यात पार्टनरला बांधलं जातं आणि नंतर दुसरा पार्टनर जे हवं ते करतो.
या गोष्टींचा केला जातो वापर
या चापट मारणे, चाबूकाच्या वापरापासून अनेक गोष्टींची वापर केला जातो. याने दोन्ही पार्टनरला सेक्शुअल प्लेजर मिळतं. तसेच यात मध, चॉकलेट आणि फळांचाही वापर करतात.
वेदना ते कोमोत्तेजना
ही एक अशी स्टाइल आहे ज्यात एकप्रकारे वेदनांची देवाण-घेवाण होते. ज्याने कामुकता आणि उत्तेजना एकाच स्तरावर पोहोचते. या स्टाइलला उत्तेजना वाढवणे आणि शारीरिक संबंधासाठी तयार करण्याची एक पद्धतही म्हटलं जातं. यात दोघेही त्यांच्या पसंतीनुसार, रोल निवडू शकतात.
बीडीएसएम हिंसा नाही
अनेक लोकांना असं वाटतं की, ही एक लैंगिक हिंसा आहे. पण ही हिंसा नसून एक वेगळी पद्धत आहे. यात ताकदीचा असा वापर केला जातो की, कुणाला जखम होऊ नये. त्यासोबतच यात जोर-जबरदस्ती तेव्हाच केली जाते जेव्हा दोन्ही पार्टनर यासाठी तयार असतील.
परदेशात लोकप्रिय
बॉन्डेज प्ले म्हणजे बीडीएसएममध्ये पार्टनरला बांधण्यासाठी कफ्स, दोरी किंवा बॉन्डेज टेपचा आधार घेतला जातो. परदेशात या पद्धतीची फार क्रेझ आहे. हॉलिवूड सिनेमा 'फिप्टी शेड्स ऑफ ग्रे' मध्येही ही स्टाइल दाखवण्यात आली आहे. पण हा सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला गेला नाही.