शारीरिक संबंधाबाबत 'हे' पुरूष असतात अधिक आक्रमक!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 03:26 PM2019-04-29T15:26:07+5:302019-04-29T15:27:20+5:30
शारीरिक संबंधाबाबत कोणते पुरूष अधिक आक्रामक असतात याबाबत नुकताच एका रिसर्च करण्यात आला. त्यानुसार काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत.
तुम्हाला माहीत आहे का की, नेहमी पार्ट्यांमध्ये जाणारे तरूण आणि पुरूष हे शारीरिक संबंधाबाबत अधिक आक्रामक असतात? असं आम्ही नाही तर एका रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, नेहमी पार्ट्यांमध्ये जाणारे तरूण आणि पुरूष किंवा मद्यसेवनासाठी बारमध्ये जाणारे पुरूष हे सेक्शुअली अग्रेसिव्ह असतात.
वॉशिंग्टन स्टेट यूनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक मायकल क्लीवलॅंड म्हणाले, 'आम्हाला रिसर्चमधून आढळलं की, शारीरिक संबंधात आक्रामकता केवळ मद्यसेवनामुळे नाही तर सोबतच त्या वातावरणामुळेही होती, जिथे मद्यसेवन केलं गेलं. या दोन्ही गोष्टी एकत्र असण्यामुळे शारीरिक संबंधादरम्यान आक्रामक पद्धती वापरल्या गेल्याची सर्वात जास्त प्रकरणे बघायला मिळाली'.
हा सर्व्हे ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता. ज्यात १ हजारांपेक्षा अधिक कॉलेजला जाणाऱ्या तरूणांनी सहभाग घेतला होता. या तरूणांना अभ्यासकांनी काही प्रश्ने विचारलीत. जसे की, ते मद्यसेवन किती दिवसांच्या अंतराने करतात? किती वेळा ते बारमध्ये जातात? किंवा पार्टी करतात? क्लीवलॅंड यांच्यानुसार, सर्व्हेमध्ये भाग घेणाऱ्या तरूणांना हेही विचारलं गेलं की, एखाद्या महिलेला शारीरिक संबंधासाठी तयार करण्यासाठी ते कोणत्या पद्धतींचा वापर करतात किंवा त्यांच्यावर दबाव टाकतात.
अभ्यासकांनुसार, या पद्धतींमध्ये ब्रेकअपची धमकी देण्यापासून ते महिला पार्टनरला जबरदस्तीने मद्यसेवन करायला लावणे आणि शारीरिक त्रास देणे या पद्धतींचा समावेश होता. हा रिसर्च जर्नल ऑफ स्टडीज ऑन अल्कोहोल अॅन्ड ड्रग्समध्ये प्रकाशित करण्यात आला. यातून समोर आलं की, जे लोक नेहमी पार्ट्यांमध्ये किंवा बारमध्ये जात होते, त्यांच्यात शारीरिक संबंधाबाबत अधिक आक्रामकता बघायला मिळाली. त्यांचे एकापेक्षा अधिक पार्टनर होते आणि ते कोणत्याही कमिटमेंटशिवाय शारीरिक संबंधाला प्राथमिकता देत होते.