लैंगिक जीवन : पहिल्यांदा ब्लीडींग गरजेचं? जाणून घ्या अशाच काही गैरसमजांबाबत...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 03:32 PM2019-03-19T15:32:32+5:302019-03-19T15:33:13+5:30

शारीरिक संबंधाबाबत आजही आपल्या समाजात खोलवर अनेक गैरसमज बघायला मिळतात. हे गैरसमज आताचे नसून अनेक वर्षांपासूनचे आहेत.

Common misconceptions and myths related to sex private parts that people believe | लैंगिक जीवन : पहिल्यांदा ब्लीडींग गरजेचं? जाणून घ्या अशाच काही गैरसमजांबाबत...

लैंगिक जीवन : पहिल्यांदा ब्लीडींग गरजेचं? जाणून घ्या अशाच काही गैरसमजांबाबत...

Next

शारीरिक संबंधाबाबत आजही आपल्या समाजात खोलवर अनेक गैरसमज बघायला मिळतात. हे गैरसमज आताचे नसून अनेक वर्षांपासूनचे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेक लोक यावर विश्वासही ठेवतात. जसे की, शारीरिक संबंधावेळी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त यायला हवं. पण लोकांना हे माहीत नसतं की, या गैरसमजांमुळे लैंगिक जीवनावर वाईट प्रभाव पडतो. चला जाणून घेऊ असेच काही गैरसमज...

महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त

असे मानले जाते की, पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवण्यादरम्यान महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येणे अनिवार्य आहे. हा त्यांच्या व्हर्जिनिटीचा मुख्य भाग मानला जातो. रक्त येणे न येणे याचा संबंध हायमन म्हणजेच प्रायव्हेट पार्टच्या आत असलेल्या एका पडद्यावर असतो. जेव्हा शारीरिक संबंधावेळी हायमनवर दबाव पडतो तेव्हा तो फाटतो. ज्यामुळे प्रायव्हेट पार्टमधून रक्त येऊ लागतं. पण हा पडदा खेळण्यादरम्यान, सायकल चालवतानाही फाटू शकतो. हेही समजून घ्यायला हवे की, प्रत्येक महिलेच्या हायमनची रुपरेषा वेगळी असते आणि  महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधील पडदा फाटल्यावर रक्त येईलच असंही नाही. 

साइज महत्त्वाची

असे मानले जाते की, लैंगिक क्रियेचा चांगला अनुभ येण्यासाठी प्रायव्हेट पार्टची साइज महत्त्वाची असते. केवळ महिलाच नाही तर पुरूषही असं मानतात. पण मुळात शारीरिक संबंधातून आनंद मिळवण्यात प्रायव्हेट पार्टच्या साइजचं काही देणं-घेणं नसतं. जर्नल ऑफ यूरोलॉजीच्या रिपोर्टनुसार, पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टची जगभरात सरासरी साइज इरेक्ट झाल्यावर ५.१ इंच आहे. लैंगिक क्रियेतून आनंद मिळण्यासाठी साइज महत्त्वाची नाही. पार्टनरसोबत कशाप्रकारे लैंगिक क्रिया करता यावर हे सगळं निर्भर असतं. दोघांचं कनेक्शन महत्त्वाचं ठरतं. 

टाइट कंडोम अधिक सुरक्षित

पुरूष आणि महिलांमध्ये एक कॉमन समज आहे की, जर कंडोम टाइट असेल तर याने प्रेग्नेंसी आणि शारीरिक संबंध यासंबंधी इतर आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. पण सत्य तर हे आहे की, टाइट कंडोममुळे फार जास्त त्रास होतो आणि तुम्ही योग्यप्रकारे लैंगिक क्रियेचा आनंदही घेऊ शकत नाहीत. 

डर्टी टॉक्स

अनेक कपल्स असं मानतात की, शारीरिक संबंधादरम्यान डर्टी टॉक्स आणि डर्टी अॅक्ट्स केल्याने लैंगिक क्रियेचा आनंद दुप्पट होतो. पण असं नाहीये. अनेक स्टडीजमधून हे समोर आलं आहे की, अनेकजण शारीरिक संबंध ठेवताना डर्टी टॉक्स अजिबात पसंत करत नाहीत. इतकेच नाही तर काही लोक असंही मानतात की, मद्यसेवन केल्याने जवळीकता वाढते. तसेच लैंगिक क्षमताही वाढते. पण हे चुकीचं आहे. मद्यसेवन करून शारीरिक संबंध ठेवणे फार रिस्की असतं. तसेच मद्यसेवन केल्याने टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सवर वाईट प्रभाव पडतो. 

Web Title: Common misconceptions and myths related to sex private parts that people believe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.