Coronavirus Effect : लॉकडाउनचा असाही परिणाम; कंडोमच्या विक्रीत कधीही झाली नव्हती एवढी वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 10:08 AM2020-03-26T10:08:40+5:302020-03-26T10:21:45+5:30
coronavirus : लॉकडाउनमुळे लोक जीवनावश्यक वस्तुंची घरात साठवणुकही करत आहेत. अशातच मेडिकल क्षेत्रातील एक रिपोर्ट समोर आला आहे.
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी देश लॉकडाउन करण्यात आला आहे. काही लोक घरातून ऑफिसचं काम करत आहेत तर काही फक्त बसून आहेत. अशात लोक जीवनावश्यक वस्तुंची घरात साठवणुकही करत आहेत. अशातच मेडिकल क्षेत्रातील एक रिपोर्ट समोर आला आहे. लॉकडाऊन झाल्यापासून कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ही वाढ 5-10 टक्क्यांची नाही तर तब्बल 50% झाली असल्याच औषध विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दुकानदारांनी सांगितले की, सामान्यपणे नवीन वर्षांच्या सुट्ट्या किंवा इतर फेस्टिव सीझनच्या सुट्टींमध्ये कंडोम्सची विक्री जास्त होत असते. मात्र या लॉकडाउनच्या काळात कंडोम्सच्या विक्रीत तब्बल 25 ते 30 टक्के वाढ झाल्याची माहिती काही दुकानदारांनी दिलीय. इतकेच नाही तर जे लोक एक किंवा दोन पाकिटं नेत होते ते आता 10 किंवा 20 कंडोम्स असलेली मोठी पाकिटं घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
एका दुकानदाराने सांगितले की, या काळात कंडोमसोबतच बर्ड कंट्रोल प्रॉडक्ट्सचा देखील खप वाढला आहे. तसेच ही मागणी आणखी वाढत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. साउथ मुंबईतील एका दुकानदाराने सांगितले की, 'कंडोम खरेदी करण्यात पुरूषांपेक्षा महिलांचं प्रमाण वाढलं आहे. त्यांच्याकडून 15 टक्के कंडोमचा खप वाढला आहे. कंडोमची इतकी डिमांड मी आजपर्यंत कधी पाहिली नाही'.
लोकांनी जास्त प्रमाणात कंडोम्सची खरेदी केल्याने अनेक दुकानांमधला स्टॉक संपलाय. सुट्टीचा लोक असाही चांगला फायदा करून घेत आहेत. इतरवेळी धावपळीच्या लाइफमुळे लोकांना लैंगिक जीवनाला फारसा वेळ देता येत नाही. पण आता लोकांना चांगली संधी चालून आली आहे. पण जर दोघांपैकी कुणीही एक आजारी असेल तर शारीरिक संबंध ठेवू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिली आहे.