लैंगिक जीवन : बेडरूम नाही तर कपल्सना लैंगिक क्रियेचा 'इथे' मिळतो जास्त आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 03:54 PM2019-02-18T15:54:36+5:302019-02-18T15:55:25+5:30
शारीरिक संबंधावेळी दोघांमध्येही सहजता असणं फार महत्त्वाचं असतं. जर दोघेही सहज नसतील तर ते लैंगिक क्रिया अजिबात एन्जॉय करू शकणार नाहीत.
शारीरिक संबंधावेळी दोघांमध्येही सहजता असणं फार महत्त्वाचं असतं. जर दोघेही सहज नसतील तर ते लैंगिक क्रिया अजिबात एन्जॉय करू शकणार नाहीत. सामान्यपणे घरीच शारीरिक संबंध ठेवले जातात. पण तरीही कपल्स बेडरूमपेक्षा जास्त हॉटेलच्या रूममध्येच लैंगिक क्रिया एन्जॉय करतात. यावेळी त्यांना मिळालेला आनंदही जास्त असतो. ही बाब अनेक रिसर्चमधून समोर आली आहे.
काय आहे कारण?
आपल्या बेडरूमऐवजी दुसऱ्या जागेवर शारीरिक संबंध ठेवल्याने कपलचा उत्साह अधिक वाढतो. याने शरीरात अधिक प्रमाणात डोपामीन हार्मोन्स रिलीज होतात. याने दोघांनाही मिळणारा आनंद अधिक असतो.
डोपामीनसोबतच घराच्या स्ट्रेसपासून सुटका मिळत असल्यानेही हॉटेलमध्ये शारीरिक संबंध अधिक आनंददायी ठरतो. घरी परिवारातील सदस्यांचं असणं आणि जबाबदाऱ्यांमुळे लैंगिक क्रिेयेदरम्यानच्या भावनांमध्ये अडथळा निर्माण होतो. खासकरून महिला या सर्व गोष्टींमुळे जास्त प्रभावित होतात. हॉटेलमध्ये अशाप्रकारच्या अडचणी येत नाहीत. अशात कपल कोणत्याही अडचणी आणि अडथळ्यांशिवाय लैंगिक क्रिया एन्जॉय करू शकतात.
हॉटेलमध्ये शारीरिक संबंध अधिक एन्जॉय करण्यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे कपल त्यांना हवं तसं एन्जॉय करू शकतात. यादरम्यान ते नव्या पोजिशन सुद्धा ट्राय करू शकता. हॉटेलमध्ये दोघेच असल्याने ते मोकळेपणा ते याबाबत बोलू शकतात. कारण यावेळी त्यांना कशाचीही भिती नसते.
रोमान्सशिवाय शारीरिक संबंध कुणीही एन्जॉय करू शकत नाही. हॉटेलमध्ये राहत असताना कपल स्वत:ला तयार करतात आणि एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवतात. याने त्यांच्या आयुष्यातील हरवलेला रोमान्स पुन्हा मिळतो. रोमान्स करत शारीरिक संबंध ठेवल्याने दोघांनाही भरपूर आनंद मिळतो.