लैंगिक जीवन : केवळ ३ महिन्यात अनेकांना उद्भभवते ही गंभीर समस्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 04:04 PM2018-11-05T16:04:43+5:302018-11-05T16:16:57+5:30
आपलं नातं टिकवून ठेवण्यासाठी तसा तर जोडीदारांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना वेळोवेळी करावा लागतो. पण यात जोडीदारांमध्ये लैंगिक उत्साह कायम राहणं किंवा ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान असतं.
(Image Credit : Psychology Today)
आपलं नातं टिकवून ठेवण्यासाठी तसा तर जोडीदारांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना वेळोवेळी करावा लागतो. पण यात जोडीदारांमध्ये लैंगिक उत्साह कायम राहणं किंवा ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. मुळात यावर आधीही खूपकाही लिहिलं आणि बोललं गेलं आहे की, काही वर्षांनी कशाप्रकारे लैंगिक जीवनातील रस कमी होतो. अनेक अभ्यासकांनी यावर अभ्यासही केले आहेत की, कशाप्रकारे काही लोक शारीरिक संबंधांबाबत अरसिक होता.
काय सांगतो रिसर्च?
लीडिंग मेडिकल रिसर्च जर्नल BMJ कडून करण्यात आलेल्या एका ओपन सर्वेनुसार, ३४ टक्के महिला आणि १५ टक्के पुरुष केवळ तीन महिन्यानंतरच शारीरिक संबंधाबाबत रस गमावून बसतात. म्हणजेच त्यांना त्यात अरसिकता वाटायला लागते.
महिलांची लवकर होतात अरसिक
या सर्वेदरम्यान याही गोष्टीचा खुलासा झाला आहे की, एखाद्या नात्यात जर एका व्यक्तीचा लैंगिक क्रियेतील उत्साह कमी होणं त्या व्यक्तींचा लिंग काय आहे यावरही अवलंबून असतं. अभ्यासकांनुसार, वचनबद्ध नात्यात राहणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक लवकर उत्साह गमावून बसतात.
महिलांनी सांगितली ही कारणे
या सर्वेमध्ये सहभागी महिलांनी शारीरिक संबंधातील उत्साह किंवा रस कमी होण्यामागची वेगवेगळी कारणे सांगितली. यातील सर्वात जास्त महिलांनी हे सांगितले की, जोडीदारासोबत त्यांची लैंगिक सुसंगतता चांगली नव्हती. त्या कारणाने कामेच्छा कमी झाली. त्यासोबतच जोडीदारासोबत लैंगिक क्रियेबाबत पसंती-नापसंती न जुळणे हेही यातील रस कमी होण्याच्या कारणात आहे.
कामेच्छेवर पडतो वयाचा प्रभाव
अभ्यासकांना हेही आढळलं की, एखाद्या गंभीर नात्यात जोडीदारांमध्ये जर कामेच्छा कमी होत असेल तर यामागे त्यांचं वाढतं वयही कारणीभूत असतं. याचा अर्थ असा की, जसजसं जोडीदारांचं वय वाढत जातं तसतसं त्यांचं एकमेकांबाबत असलेलं लैंगिक आकर्षण कमी होतं.
नात्यात अरसिकता येऊ देऊ नका
तज्ज्ञांनुसार, वचनबद्ध नात्यात लैंगिक संबंधाबाबत अरसिकता येऊ नये याची काळजी जोडीदारांनी घेणे गरजेचे आहे. जोडप्याने एकमेकांशी बोलून लैंगिक संबंधाबात पसंती-नापसंती याबाबत माहिती घेतली पाहिजे. जेणेकरुन दोघांमध्ये गैरसमज होऊ नये किंवा न्यूनगंड येऊ नये.
काही लपवू नका
अनेकवर्षांपासून असलेल्या नात्यात काही काळाने लैंगिक संबंधाबाबत उत्साह कमी होणे सामान्य बाब आहे. पण ही बाब जोडीदारापासून लपवून ठेवण्याऐवजी यावर दोघांनी मोकळेपणाने बोलावे. एखादी समस्या निर्माण होते तेव्हा त्यावेळीच जर त्यावर उपाय केला गेला तर पुढे होणारी मोठी समस्या टाळता येऊ शकते.