लैंगिक जीवन : ऐनवेळी अनेक कपल्सना राहते परफॉर्मन्सची चिंता, 'हे' उपाय ठरतील फायदेशीर....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 04:51 PM2021-01-30T16:51:36+5:302021-01-30T16:52:12+5:30

सेक्शुअल मेडिसिन रिव्ह्यूमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, ९ ते २५ टक्के पुरूष इरेक्शन आणि शीघ्रपतन होण्यासंबंधी चिंतेमुळे हैराण झालेले असतात.

Couples worry about their performance during sexual relation these tips will help | लैंगिक जीवन : ऐनवेळी अनेक कपल्सना राहते परफॉर्मन्सची चिंता, 'हे' उपाय ठरतील फायदेशीर....

लैंगिक जीवन : ऐनवेळी अनेक कपल्सना राहते परफॉर्मन्सची चिंता, 'हे' उपाय ठरतील फायदेशीर....

googlenewsNext

रिलेशनशिपमध्ये कपल्स एकमेकांच्या आनंदाची आणि संतुष्टीची पूर्ण काळजी घेतात. अनेकजण पुरूष शारीरिक संबंधावेळी त्यांच्या परफॉर्मन्सबाबत विचार करत राहतात. जेणेकरून ते त्यांच्या पार्टनरची इच्छा पूर्ण करू शकतील. यामुळे अनेकजण आधीच चिंतेत राहतात आणि सतत त्याच गोष्टीचा विचार करतात. अशात त्यांचा परफॉर्मन्स अधिक बिघडतो.

सेक्शुअल मेडिसिन रिव्ह्यूमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, ९ ते २५ टक्के पुरूष इरेक्शन आणि शीघ्रपतन होण्यासंबंधी चिंतेमुळे हैराण झालेले असतात. तेच ६ ते १६ टक्के महिलांमध्ये शारीरिक संबंध स्थापन करण्यासाठी इच्छा मोठी अडचण ठरते. तुम्हालाही शरीरसंबंधावेळी परफॉर्मन्सची चिंता राहत असेल तर काही टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. जेणेकरून तुम्हाला चांगला आनंद मिळेल.

शारीरिक संबंधाबाबत चिंता का?

व्यक्ती जेव्हा एखाद्या गोष्टीमुळे तणावात असतो किंवा चिंतेत असतो तेव्हा याचा थेट प्रभाव त्यांच्या लैंगिक जीवनावर पडतो. सेक्शुअल मेडिसिन रिव्ह्यूमध्ये प्रकाशित रिसर्चनुसा, शारीरिक संबंध ठेवण्याच्या इच्छेदरम्यान जेव्हा चिंता किंवा तणाव राहतो. तेव्हा याने शरीराचं नर्वस सिस्टीम प्रभावित होतं. जर कपलने परफॉर्मन्सच्या चिंता करण्याच्या सवयीवर कंट्रोल मिळवला तर त्यांचं लैंगिक जीवन अधिक आनंदी होऊ शकतं. ( हे पण वाचा : लैंगिक जीवन : मद्यसेवनामुळे कामेच्छा खरंच कमी होते का? वाचा तज्ज्ञांचं मत..)

चेकअप करा

जर एखाद्या व्यक्तीला शुदर किंवा एंडोमेट्रियोसिसशी संबंधित समस्या असेल तर ती व्यक्ती शारीरिक संबंध ठेवताना तणावात राहिल. शरीरसंबंधावेळी रक्तसंचार प्रभावित होतो. अशा स्थितीत एकदा शरीराची टेस्ट नक्की करून घ्या. जर इंटिमेट होताना तणाव राहत असेल त्याची कारणे माहीत होती. जेणेकरून लैंगिक जीवन अधिक आनंदी करता येईल.

शरीराला समजून घ्या

पार्टनरसमोर अनेकांना स्वत:च्या शरीराची लाज वाटत असते. याला बॉडी शेमिंग म्हणतात. तेच अनेकदा संबंध ठेवताना परफॉर्मन्सबाबतही अनेकांना लाज वाटते. आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. तसेच तुमचं शरीर जसं आहे तसं ते तुम्ही अक्सेप्ट केलं पाहिजे. 

पार्टनरसोबत बोला

तुम्ही तुमच्या जो़डीदारासोबत शारीरिक संबंधाबाबत चर्चा केली पाहिजे. इंटिमेट होण्यापूर्वी चांगला संवाद फार फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही शारीरिक संबंधाबाबत काय विचार करता, तुम्हाला काय आवडतं याबाबत मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे. जोडीदाराचा सल्लाही घेऊ शकता. तुम्ही तुमच्या पार्टनरला जेवढं लाजाल तेवढा तुमचा परफॉर्मन्स वाईट होईल.

Web Title: Couples worry about their performance during sexual relation these tips will help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.