शारीरिक संबंधानंतर लगेच उठून जाता? मग हे वाचाच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 03:22 PM2018-12-20T15:22:49+5:302018-12-20T18:27:51+5:30
अनेकजण बहुदा शारीरिक संबंध ठेवून झाल्यावर एकतर लगेच झोपतात किंवा आपल्या कामाला लागतात. अनेकजण केवळ शारीरिक संबंधाच्या तेवढ्याच क्रियेला महत्त्व देतात.
(Image Credit : www.dreams.co.uk)
अनेकजण बहुदा शारीरिक संबंध ठेवून झाल्यावर एकतर लगेच झोपतात किंवा आपल्या कामाला लागतात. अनेकजण केवळ शारीरिक संबंधाच्या तेवढ्याच क्रियेला महत्त्व देतात. पण हे केवळ इतक्यावरच संपत नसतं. एका रिसर्चनुसार, शारीरिक संबंधानंतरही काहीवेळ एकमेकांच्या जवळ राहणे गरजेचं असतं. याने दोघांनाही आनंद मिळतो आणि मन व मेंदूलाही आनंद मिळतो.
एका सर्वेनुसार, आता काही लोक शारीरिक संबंधानंतर एकमेकांच्या मिठीत राहणे किंवा आलिंगन देण्याला महत्त्व देऊ लागले आहेत. कारण आलिंगणामुळे अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. चला तर जाणून घेऊ आलिंगणाचे फायदे....
आता लोकांना कळतंय महत्त्व
सर्वेनुसार, ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचं असं मत आहे की, संभोगाशिवाय चुंबन आणि आलिंगनाला ते जास्त महत्त्व देतात. एक्सप्रेस डॉट को डॉट को यूके या वेबसाइटनुसार, या सर्वेने दावा केला आहे की, एका चांगल्या लैंगिक क्रिेयेत फोरप्लेनंतर संभोगाची वेळ येते. तसेच या सर्वेमध्ये हेही सांगण्यात आलं आहे की, जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवल्यावर लगेच
जेव्हा दोघेही शारीरिक संबंधानंतर एकमेकांना जवळ घेऊन थोडावेळ घालवतात, प्रेमाच्या गोष्टी करतात, तेव्हा हे नातं आणखी मजबूत होतं. यात आलिंगन म्हणजेच मिठीची महत्त्वाची भूमिका असते. असे केल्याने लैंगिक समाधान तर मिळतच सोबतच दोघांचही एकमेकांप्रति प्रेमही वाढतं.
बॉन्डिंग टाइम गरजेचा
यूनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोमधील अभ्यासक एमी म्यूज यांच्यानुसार, ज्या जोडप्यांना शारीरिक संबंध ठेवताना सहजता वाटत नाही. त्यांच्यासाठी शारीरिक संबंध ठेवल्यानंतरचा बॉंडिंग टाइम फार महत्वाचा असतो. जोडीदाराला प्रेमाने मिठी मारणे आणि चंबन घेणे याने दोघांमध्येही आपलेपणा वाढतो. जे लोक शारीरिक संबंधानंतर साधारण १५ मिनिटांपर्यंत एकमेकांना जवळ घेऊन वेळ घालवतात, नात्याबाबत आणि लैंगिक जीवनातही समाधानी असतात.
जादू की झप्पीचे फायदे
डेली मेलनुसार, जोडीदाराला मिठी मारल्याने रक्तात ऑक्सिटोसिन नावाच्या हार्मोना स्त्राव होतो. याने हाय ब्लड प्रेशर कमी होतं, तणाव आणि अस्वस्थताही दूर होते. तसेच याने स्मरणशक्तीही वाढते. व्हिएन्ना यूनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका शोधानुसार, मिठी मारताना काळजी घेणेही गरजेचे आहे. तुम्ही त्यांना मिठी मारु शकता ज्यांना तुम्ही फार चांगलं ओळखता किंवा जे तुमचे चांगले मित्र आहेत. ऑक्सिटोसिन हार्मोन आई-वडील, अपत्य आणि जोडीदारांमध्ये जवळीकता वाढवण्याचं प्रमुख कारण मानला जातो. जे लोक अॅक्टिव रिलेशनशिपमध्ये असतात त्यांच्यातही ऑक्सिटोसिनचा स्तर अधिक असतो.