लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर रडायला येतं का? हे असू शकतं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 03:55 PM2019-01-31T15:55:25+5:302019-01-31T15:55:37+5:30
वैवाहिक जीवनात दोघांच्याही आनंदासाठी शारीरिक संबंध महत्त्वाचा भाग असतो. पण आजही यावर मोकळेपणाने बोलले जात नाही.
वैवाहिक जीवनात दोघांच्याही आनंदासाठी शारीरिक संबंध महत्त्वाचा भाग असतो. पण आजही यावर मोकळेपणाने बोलले जात नाही. याच कारणाने अनेकांना सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतरही नैराश्य, चिडचिडपणा आणि डिप्रेशनचे शिकार होत आहेत. याला मेडिकलच्या भाषेत पोस्ट कॉयटल डिस्फोरिया, पोस्ट कॉयटल डिप्रेशन किंवा पोस्ट सेक्स ब्लूज असे म्हटले जाते.
वेगवेगळ्या देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार, ५ टक्के महिलांना शारीरिक संबंधानंतर लगेच असा अनुभव येतो. तर ४५ टक्के महिलांनी त्यांच्या आयुष्यात कधी कधी पोस्ट सेक्स ब्लूजचा सामना केला आहे. तसेच या सर्व्हेक्षणातून आणखी एका धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे आता पुरूषही पोस्ट सेक्स ब्लूजचे शिकार होत आहेत.
क्वींजलॅंड यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या एका सर्व्हेक्षणानुसार ही बाब समोर आली आहे. या अभ्यासाचे मुख्य लेखक रॉबर्ट डी यांनी सांगितले की, सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतरही अनेकदा नैराशाची एक भावना जागृत होते. ही एक मेडिकल प्रॉब्लेम आहे.
हा अभ्यास २३० महिलांवर करण्यात आला. यातून असं आढळलं की, चांगले शारीरिक संबंध ठेवल्यानंतरही त्यांना तणाव आणि नैराश्यासारख्या भावनांचा सामना करावा लागला. कधी कधी तर हे भाव इतके तीव्र होतात की, महिला रडू लागतात. त्यानंतर पुढील काही आठवडे या तणावाचा त्यांच्यावर प्रभाव राहतो. हा भावनांचा एक कन्फ्यूजिंग काळ आहे. हा अनेकांना शारीरिक संबंधानंतर जाणवतो. म्हणजे यात एकीकडे लोक सहमीतने शारीरिक संबंध ठेवून आनंद तर मिळवतातच पण सोबतच त्यानंतर त्यांना तणाव येतो.
काय आहे कारण?
क्वींसलॅंड यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, ऑस्ट्रेलियाने पोस्ट सेक्स ब्लूजचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. अभ्यासकांनी जेव्हा या अभ्यासात सहभागी लोकांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा असे आढळले की, सोशल कंडिशनिंग हे याचं मुख्य कारण आहे. या लोकांनी हे मान्य केलं की, बालपणापासूनच त्याच्यात हा विचार असतो की, शारीरिक संबंध एक वाईट गोष्ट आहे आणि चांगल्या लोकांनी यापासून दूर राहिलं पाहिजे. असं नाहीये की, केवळ महिलाच याप्रकारच्या सोशल कंडिशनिंगच्या शिकार आहेत. पुरूषही पोस्ट सेक्स ब्लूजचे शिकार होतात. पण पुरूषांमध्ये याचे परिणाम वेगवेगळे बघायला मिळतात.
सूचना
पोस्ट सेक्स ब्लूज ही एक मानसिक समस्या आहे. जर सतत असं होत असेल तर चांगल्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. तसेच जोडीदाराला वाईट वाटू नये म्हणून शारीरिक संबंधानंतर एकमेकांची भावनात्मक जवळीक कायम ठेवा. एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करा. अनेकदा महिला शारीरिक संबंधानंतर अशा भावनात्मक स्थितीत पोहोचतात की, त्यांना वाटतं त्या जोडीदाराला गमावणार तर नाही ना? अशावेळी त्यांना हा विश्वास देणे गरजेचे आहे की, शारीरिक संबंध काही अल्टीमेट गोल नाहीये, तर दोन व्यक्तीमधील भावनात्मक संबंध हे महत्त्वाचं आहे.