लैंगिक जीवन : तेल वापरल्याने खरंच फायदा होतो का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 04:42 PM2018-11-26T16:42:26+5:302018-11-26T16:42:57+5:30

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतोय. आयुर्वेदातही लैंगिक क्षमता आणि उत्तेजना वाढवणाऱ्या अशा काही तेलांबाबत सांगितले आहे.

Does really increase sex power use of oil? | लैंगिक जीवन : तेल वापरल्याने खरंच फायदा होतो का?

लैंगिक जीवन : तेल वापरल्याने खरंच फायदा होतो का?

googlenewsNext

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतोय. आयुर्वेदातही लैंगिक क्षमता आणि उत्तेजना वाढवणाऱ्या अशा काही तेलांबाबत सांगितले आहे. लोक आपली लैंगिक क्षमता वाढवण्यासोबतच तेलाचा वापर कामेच्छा आणि कामुक भावना जागृत करण्यासाठीही करत आले आहेत. 

का होतात समस्या?

शारीरिक संबंध ही प्रत्येक व्यक्तीची शारीरिक गरज आहे. पण आजकाल बदलत्या लाइफस्टाइलमुळे कामेच्छा आणि लैंगिक क्षमता कमी होताना दिसत आहे. तशी तर यामागे अनेक कारणे असू शकतात. पण खराब जीवनशैली, औषधांचं अधिक सेवन, अधिक तणाव आणि डिप्रेशन ही या समस्येची काही मुख्य कारणे सांगितली जातात. 

प्रभावित होत आहे लैंगिक जीवन

कामेच्छा कमी होत असल्याने आणि लैंगिक क्षमता कमी होत असल्याने व्यक्तीचं वैवाहिक जीवन प्रभावित होऊ लागलं आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमजोर होऊ लागला आहे. मात्र, ही लैंगिक उत्तेजना कमी होण्याची समस्या दूर करुन नैसर्गिक रुपाने लैंगिक क्षमता वाढवली जाऊ शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. 

तेलाने कसा होतो फायदा?

सध्या लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम तेल उपलब्ध आहेत. हे तेल नैसर्गिक रुपाने तयार केलं जातं, त्यामुळे यांचा वापरही वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. चला जाणून घेऊन तेलाचा वापर करुन लैंगिक उत्तेजना वाढवण्यास कशी मदत होते.

लैंगिक क्षमतेत कमतरता येण्याचं एक मुख्य कारण तणाव हे सांगितलं जातं. त्यामुळे अशा स्थितीत आवश्यक तेलाच्या सुगंधाने तणाव कमी होतो आणि जोडीदाराप्रति जवळीकता वाढते. आवश्यक तेल (ESSENTIAL OILS) गुप्तांगांचा तणाव दूर करतं आणि याच कारणाने या अंगांना उत्तेजित होण्यास मदत मिळते. 

लॅवेंडर ऑइलसहीत इतरही तेल झाडांपासून आणि फुलांपासून नैसर्गिक पद्धतीने तयार केले जातात. त्यामुळे यातील औषधी गुण लैंगिक क्षमता वाढवण्यास मदत करतात, असे सांगितले जाते. लॅवेंडर ऑइलमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुण असतात, जे लैंगिक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतात. 

आवश्यक तेलांचा सुगंध व्यक्तीला भावनात्मक रुपाने उत्तेजित करतो. प्राचीन काळापासून ही मान्यता आहे की, सुगंधित वस्तू किंवा द्रव्यामुळे लैंगिक इच्छेसाठी प्रेरित होते. यासोबतच या तेलामुळे मसाज केल्यानेही लैंगिक क्षमता वाढते, असे म्हटले जाते. 

(टिप : कोणत्याही तेलाने लैंगिक क्षमता वाढते असा दावा आम्ही करत नाही. केवळ या गोष्टी माहिती म्हणून आम्ही देतो आहोत. तुम्हाला लैंगिक जीवनाबाबत कोणत्याही समस्या असतील तर आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यानंतर उपाय करावा.)
 

Web Title: Does really increase sex power use of oil?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.