लैंगिक जीवन : कमी वयात शारीरिक संबंध ठेवणं धोकादायक?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 02:52 PM2019-01-12T14:52:47+5:302019-01-12T14:54:46+5:30

कमी वयात शारीरिक संबंध ठेवल्यानेे काय होतं? यावर एक रिसर्च करण्यात आला आहे.

Does sex at a young age cause harm to health | लैंगिक जीवन : कमी वयात शारीरिक संबंध ठेवणं धोकादायक?

लैंगिक जीवन : कमी वयात शारीरिक संबंध ठेवणं धोकादायक?

Next

एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, कमी वयात शारीरिक संबंध ठेवल्याने सर्वात जास्त नुकसान तरुणींना होतं. याचं कारण हे आहे की, या वयात योग्य माहिती नसल्याने शारीरिक संबंध ठेवताना तरुणी स्वच्छतेची काळजी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना संक्रमण(STD), हर्पिस(Herpes) एचआयव्ही एड्स सहित इतरही संक्रमणाची समस्या होऊ शकते. त्यामुळे कमी वयात शारीरिक संबंध ठेवणे हानिकारक मानले जात आहे. 

गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका

एका रिसर्चनुसार, कमी वयात शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणींमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर (cervical cancer) चा धोका वाढतो.कमी वयाच्या महिलांवर करण्यात आलेल्या शोधात अभ्यासकांना आढळलं की, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर या महिलांच्या शरीरात यौन संचारित विषाणूंची (sexually transmitted virus)  संख्या वाढली. या विषाणूंमुळे सर्वाइकल कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे कमी वयात शारीरिक संबंध ठेवणे हानिकारक आहे.

अनैच्छिक गर्भधारणा

सामान्यपणे मुलींना १२ वयातच मासिक पाळी येणे सुरु होते. एकदा मासिक पाळी सुरु झाली की, कोणतीही मुलगी शारीरिक संबंध ठेवल्यावर गर्भवती राहू शकते. कमी वयात मुलींना याबाबत फार माहिती नसते. त्यामुळे काहीच विचार न करता काही मुली शारीरिक संबंध ठेवतात. अशात मुलीच्या आरोग्याला आणि चारित्र्याला धक्का लागू शकतो.   

मेंदूचा विकास कमी होतो

कमी वयात मुला-मुलींच्या मेंदूचा पूर्ण विकास झालेला नसतो आणि याच वयात शारीरिक संबंध ठेवल्याने मेंदूवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. ज्यामुळे शरीर आणि मेंदू दोन्हीचा विकास खुंटतो. हजारो लोकांवर करण्यात आलेल्या शोधात अभ्यासकांना आढळलं की, अल्प वयात शारीरिक संबंध ठेवल्याने मुली आणि मुलांचा व्यवहार त्यांच्यापेक्षा वय जास्त असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक उत्तेजक असतो. त्यासोबतच त्यांच्या मेंदू किंवा हार्मोन्समध्येही मोठा बदल होतो. ज्याकारणाने मेंदूचा विकास खुंटतो. त्यामुळेच कमी वयात शारीरिक संबंध ठेवणे नुकसानकारक ठरतं. 
 

Web Title: Does sex at a young age cause harm to health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.