'या' एका गोष्टीमुळे लैंगिक जीवनाचा घेऊ शकाल दुप्पट आनंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 04:27 PM2019-02-28T16:27:29+5:302019-02-28T16:31:47+5:30
शारीरिक संबंधाबाबत अनेकांना वेगवेगळ्या समस्या असतात. त्यात महिलांना असणारी एक मोठी समस्या म्हणजे स्वत:च्या शरीराबाबत वाटणारा संकोच.
शारीरिक संबंधाबाबत अनेकांना वेगवेगळ्या समस्या असतात. त्यात महिलांना असणारी एक मोठी समस्या म्हणजे स्वत:च्या शरीराबाबत वाटणारा संकोच. अनेक महिलांना शरीराबाबत संकोच वाटत असल्याने लैंगिक क्रियेत अनेक अडचणी येतात. जर तुम्ही स्वत: तुमच्या शरीराबाबत सहज नसाल तर अर्थातच पार्टनर समोर आल्यावर तुम्हालाही संकोच वाटणारच. या सर्व गोष्टीमुळे नात्यात सहजताच राहणार नाही आणि तुम्हाला पार्टनरसोबत कनेक्टेड वाटणार नाही.
शरीराबाबत असहज असण्यामुळे लैंगिक जीवन प्रभावित होतं आणि तुम्हाला संतुष्टी मिळणार नाही. एक्सपर्ट्सनुसार, एकच अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुम्हाला चांगला लैंगिक अनुभव मिळू शकतो आणि ती गोष्ट म्हणजे पार्टनरची स्तुती, तिचं कौतुक करणं. ही बाब जरी फारच शुल्लक किंवा विचित्र वाटत असली तरी ही गोष्ट केल्याने तुमचं लैंगिक जीवन वेगळं ठरू शकतं.
जर्नल ऑफ सेक्स अॅन्ड मॅरिटल थेरपीमध्ये प्रकाशित एका रिसर्चसाठी १८ ते ३० वयोगटातील २०० महिलांवर अभ्यास करण्यात आला. या सर्व महिला कमिटेड रिलेशनशिपमध्ये होत्या. या रिसर्चदरम्यान महिलांना विचारण्यात आले की, त्यांना त्यांच्या बॉडीबाबत काय वाटतं? आणि त्यांचे पार्टनर त्यांच्या बॉडीबाबत काय विचार करतात?
तसेच अभ्यासकांनी महिलांना त्यांच्या लैंगिक जीवनाबाबत आणखीही काही प्रश्न विचारले. त्यात त्यांना शारीरिक संबंधाची इच्छा किती वेळ जागृत होते, त्यांच्या उत्तेजनेचा स्तर काय असतो, लुब्रिकेशन, किती वेळा ऑर्गॅज्मचा अनुभव होतो आणि शारीरिक संबंधानंतर संतुष्टीचा अनुभव होतो का? हे प्रश्न विचारण्यात आलेत.
त्यावरून काढण्यात आलेले या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, ज्या महिलांच्या पार्टनरने त्यांच्या लुक्सचं आणि शरीराचं कौतुक केलं त्या महिलांना जास्त संतुष्टीचा अनुभव मिळाला आणि त्यांची कामेच्छा सुद्धा अनेक पटीने जास्त होती. पण ज्या महिला त्यांच्या शरीराबाबत असहज होत्या किंवा ज्यांना संकोच वाटला, त्यांना यातील कुठलाच चांगला अनुभव आला नाही. या रिसर्चनुसार, जे पुरूष पार्टनर खास क्षणांवेळी त्यांच्या पार्टनरचं कौतुक करतात किंवा त्यांची स्तुती करतात त्या महिलांची कामेच्छा अधिक चांगली असते.