लैगिक जीवन : काय असते Edging पद्धत ज्याद्वारे मिळतो परमोच्च आनंदाचा अनुभव?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 03:34 PM2019-04-25T15:34:52+5:302019-04-25T15:43:18+5:30
सेक्स थेरपिस्टच नाही तर अनेक कपल्समध्येही Edging पद्धतीची लोकप्रियता वाढत आहे. चला जाणून घेऊ काय आहे ही पद्धत....
गेल्या काही दिवसांपासून सेक्स थेरपिस्टमध्ये Karezza टेक्निक चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचप्रमाणे Edging या शारीरिक संबंधाच्या आणखी एका पद्धतीबाबत कुतूहल बघायला मिळत आहे. सेक्स थेरपिस्टच नाही तर अनेक कपल्समध्येही Edging पद्धतीची लोकप्रियता वाढत आहे. चला जाणून घेऊ काय आहे ही पद्धत....
ऑर्गॅज्म कंट्रोल करण्याची योग्य पद्धत
metro.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, एजिंग (edging) ही शारीरिक संबंधाची अशी प्रॅक्टिस आहे ज्यात ऑर्गॅज्म कंट्रोल केलं जातं. म्हणजे यात एक पार्टनर त्याच्या दुसऱ्या पार्टनरला ऑर्गॅज्मच्या अनुभवाच्या जवळ तर घेऊन जातो, पण ऑर्गॅज्म होण्याआधीच माघार घेतो. त्यानंतर पुन्हा आपली लैंगिक ऊर्जा एकत्र करुन पुन्हा पार्टनरला ऑर्गॅज्मपर्यंत घेऊन जातो.
यामुळेही लोकप्रिय एजिंग सेक्स
ऑर्गॅज्म कंट्रोलला अलेक्स कन्फर्टचं पुस्तक 'द न्यू जॉय ऑफ सेक्स' मध्ये स्लो मास्टरबेशनचं नावं दिलं आहे. याला एक्सटेंडेट मॅसिव्ह ऑर्गॅज्म असंही म्हटलं जातं.
असं करतात ऑर्गॅज्म कंट्रोल
ऑर्गॅज्मचा अनुभव मिळवण्यासाठी कपल्स पार्टनर्ड सेक्स किंवा मास्टरबेशनचा आधार घेऊ शकतात. पार्टनर्ड सेक्समध्ये एक पार्टनर दुसऱ्या पार्टनरला स्टिम्युलेट करतो आणि हळूहळू हाय ऑर्गॅज्मच्या स्थितीपर्यंत घेऊन जातो. यात जास्त वेळापर्यंत ऑर्गॅज्म होऊ दिलं जावं आणि पुन्हा पुन्हा ही प्रक्रिया करावी, कारण याने सेक्शुअल टेन्शन आणि उत्तेजना वाढते.
ऑर्गॅज्म कंट्रोलचा फायदा
मास्टरबेशनदरम्यान ऑर्गॅज्म कंट्रोल टेक्निकने फार मदत मिळते. याने सेक्शुअल प्लेजर तर वाढतंच, सोबतच पार्टनरसाठी एक ट्रेनिंग टूल म्हणूणही काम करतं. याच्या मदतीने पार्टनरचा ना केवळ शारीरिक संबंधाचा वेळ वाढतो तर तुम्हाला ऑर्गॅज्मचा चांगला अनुभवही मिळतो.
महिलांना ही टेक्निक पसंत
एजिंग सेक्स टेक्निकची एक स्टाइल म्हणजे पॉज एजिंग (Pause Edging) महिलांना फार पसंत आहे. त्यांच्यानुसार, या स्टाइलमुळे फार फायदा होतो आणि तीव्र ऑर्गॅज्मचा अनुभव मिळतो. यासाठी मेल पार्टनरने फिमेल पार्टनरला ऑर्गॅज्मच्या स्थितीपर्यंत घेऊन जावं. फिमेल प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूला स्पर्श करु नये आणि पार्टनर नॉर्मल अवस्थेत येण्याची वाट बघावी. ही प्रक्रिया पुन्हा तशीच करा आणि ऑर्गॅज्मच्या स्थितीपर्यंत जाऊन थांबा. याने फिमेल पार्टनर तसाच ऑर्गॅज्म मिळेल जसा त्यांना हवा.
एजिंग सेक्सचा फायदा
एजिंग सेक्स टेक्निकमुळे पेल्विक एरिया म्हणजेच गुप्तांगाच्या आजूबाजूच्या भागातील ब्लड फ्लो चांगला होतो. एका रिसर्चनुसार, Edging ऑर्गॅज्मला परमोच्च स्थितीत पोहोचण्यात मदत करते. ज्याने मेल आणि फिमेल पार्टनरला संतुष्टी मिळते.
मेंदूच्या 'या' भागासाठीही फायदेशीर
ही प्रोसेस पार्टनरसोबतही परफॉर्म केली जाऊ शकते आणि पार्टनर विनाही. २००५ मध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, एजिंगमुळे महिलांच्या मेंदूमध्ये असलेल्या amygdala आणि hippocampus वर सकारात्मक प्रभाव पडतो. हे दोन्ही भाग भीती आणि टेन्शनशी संबंधित आहेत.
प्री-मच्योर इजॅक्युलेशनसाठी फायदेशीर
न्यू यॉर्कचे यूरोलॉजिस्ट स्टेसी लोइब यांच्यानुसार, एजिंगच्या मदतीने पुरुषांमध्ये प्री-मच्योर इजॅक्युलेशनची समस्याही दूर होण्यात मदत मिळते. सोबतच याच्या मदतीने प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
(टिप : वरील सल्ले किंवा मुद्दे हे केवळ माहिती म्हणूण वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याकडे प्रोफेशनल सल्ल्याचा दृष्टीने बघू नये. यातील काहीही करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला घेणे फायद्याचं ठरेल.)