लैंगिक जीवन : 'या' ५ नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांनी परत मिळवा तुमची हरवलेली कामेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 03:25 PM2019-10-21T15:25:48+5:302019-10-21T15:26:34+5:30

असं तर होत नसतं की, तुम्ही नेहमीच शारीरिक संबंध ठेवण्याच्या मूडमध्ये राहाल. कधी-कधी सेक्स ड्राइव्ह म्हणजेच कामेच्छा कमी होणे सामान्य बाब आहे.

Experiencing low sex drive improve it naturally | लैंगिक जीवन : 'या' ५ नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांनी परत मिळवा तुमची हरवलेली कामेच्छा!

लैंगिक जीवन : 'या' ५ नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांनी परत मिळवा तुमची हरवलेली कामेच्छा!

googlenewsNext

(Image Credit : chatelaine.com)

असं तर होत नसतं की, तुम्ही नेहमीच शारीरिक संबंध ठेवण्याच्या मूडमध्ये राहाल. कधी-कधी सेक्स ड्राइव्ह म्हणजेच कामेच्छा कमी होणे सामान्य बाब आहे. बाळाच्या जन्मानंतर, हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आणि लैंगिक आजारामुळे अनेकांना कामेच्छा कमी जाणवते. अशात बरेच लोक त्यांची गमावलेली कामेच्छा परत मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे टॉनिक्स आणि सप्लिमेंट्स घेतात. पण याचे अनेक साइड इफेक्टही होतात. अशात आम्ही तुम्हाला कामेच्छा परत मिळवण्यासाठी काही खास टिप्स सांगत आहोत. महत्वाची गोष्ट  म्हणजे याचे काही साइड इफेक्टही नाहीत. 

एक्सरसाइज करा

हे भलेही फारच सामान्य वाटत असलं तरी वेगवेगळ्या रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, एक्सरसाइज केल्याने तुमची कामेच्छा चांगली होऊ शकते. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की, एक्सरसाइज करणं म्हणजे तुम्ही जिममध्येच जायला पाहिजे असं नाही. तुम्ही सकाळी आणि सायंकाळी रनिंग करू शकता. सोबतच पेल्विक एक्सरसाइज जसे की, कीगल एक्सरसाइजही करू शकता. याने तुमची कामेच्छा वाढू शकते.

स्ट्रेस ठेवा दूर

तुम्हाला हे लक्षात येत नसेल पण रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे येणाऱ्या स्ट्रेसने म्हणजेच तणावाने कामेच्छा कमी होते. जेव्हाही तुम्ही तणावात राहता तेव्हा तुमचं शरीर नेहमी फाइट मोडमध्ये राहतं. ज्याने हृदय, मेंदू, मन आणि शरीरावर फार प्रेशर येतं. स्ट्रेसमुळे शरीर कॉर्टिसोल हार्मोन रिलीज करतं आणि याने टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं. 

स्वत:वर प्रेम करा

काही तज्ज्ञ सांगतात की, कामेच्छा कमी वाटत असेल किंवा काही करण्याची इच्छा होत नसेल तर ही समस्या दूर करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे स्वत:वर प्रेम म्हणजेच मास्टरबेशन. जेव्हा तुम्हाला स्वत: तुम्हाला कशी उत्तेजना जाणवत आहे. तेव्हा तुम्ही पार्टनरसोबतही तेच करण्यासाठी तयार व्हाल. सोबतच पार्टनरसोबत बोला की, तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे कामेच्छा कमी जाणवत आहे.

खाण्या-पिण्यावर द्या लक्ष

जर खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे तुमचं आरोग्य बिघडत असेल तर याचा थेट प्रभाव तुमच्या सेक्शुअल लाइफवर पडतो. त्यामुळे गमावलेली कामेच्छा परत मिळवण्यासाठी रोजच्या आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश करा. त्यात अंजीर, अॅवोकाडो, केळी, चॉकलेट्स आणि लसणाचा समावेश करा.

सेन्शुअल मसाज

सेन्शुअल उत्तेजना वाढवायची असेल तर मसाज टेक्निकची मदत होऊ शकते. जर तुमचं लैंगिक जीवन स्ट्रेस, चिंता, रागामुळे प्रभावित होत असेल तेव्हा मसाज फायदेशीर ठरते. पार्टनरच्या हाताने सेन्शुअल मसाज घेण्यापेक्षा आणखी काय चांगलं असू शकतं. सर्वातआधी तर रूमचे दिवे मंद करा, रोमॅंटिक हळूवार म्युझिक लावा आणि सुगंधी तेलाचा वापर करून मसाज सुरू करा. स्किन टू स्किन कॉन्टॅक्टमुळे तुमच्यातील ऑक्सिटोसिनचं प्रमाण वाढेल आणि तुम्हाला आराम मिळेल. तसेच तुमची पार्टनरसोबत जवळीकताही वाढेल.


Web Title: Experiencing low sex drive improve it naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.