लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिला पुरूषांच्या 'या' ५ गोष्टी करतात नोटीस!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 04:13 PM2019-06-29T16:13:46+5:302019-06-29T16:17:02+5:30
रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध ठेवणे प्रेम व्यक्त करण्याची सर्वाच चांगली पद्धत आहे. असे मानले जाते की, या क्षणांमध्ये दोन्ही व्यक्ती सगळंकाही विसरून एकमेकांमध्ये हरवून जातात.
(Image Credit : Masel Urology)
रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध ठेवणे प्रेम व्यक्त करण्याची सर्वाच चांगली पद्धत आहे. असे मानले जाते की, या क्षणांमध्ये दोन्ही व्यक्ती सगळंकाही विसरून एकमेकांमध्ये हरवून जातात. पण असं खरंच होतं का? काही तज्ज्ञ यावर पूर्णपणे विश्वास ठेवत नाहीत.
boldsky.com ने दिलेल्या एका वृत्तानुसार, शारीरिक संबंध ठेवण्यादरम्यान लोक त्यांच्या पार्टनरला पारखतात. हे काम महिला अधिक करतात. तज्ज्ञांनुसार, शारीरिक संबंधावेळी त्यांचं मन त्यावर केंद्रीत असतं, पण त्यांचं सब-कॉन्शिअस मन त्यांच्या पार्टनरला ऑब्जर्व करत असतं. एका रिसर्चनुसार, महिला शारीरिक संबंधादरम्यान खाली पाच गोष्टींवर लक्ष देऊ असतात.
पार्टनरचा श्वास
शारीरिक संबंधादरम्यान श्वास घेण्याचा वेग वाढतो. हृदयाचे ठोकेही वाढतात. या स्थितीत दोघेही एकमेकांच्या इतके जवळ असतात की, दोघेही श्वासांना फील करू शकतात. एक्सपर्ट्सनुसार, महिला शारीरिक संबंध ठेवण्यादरम्यान पार्टनरच्या श्वासांना नोटिस करतात. इंटिमेट क्षणांवेळी किस, मिठी मारणे इत्यादी क्रियांदरम्यान श्वासात होणारा चढ-उतार महिलांना जाणवतो आणि त्याने त्या प्रभावित होतात.
पार्टनरच्या शरीराचा आकार आणि वजन
शारीरिक संबंध ठेवतानाच एक महिला किंवा पुरूषाला आपल्या पार्टनरचं वजन जाणवू शकतं. अभ्यासकांचं हे मत आहे की, महिलांना पुरूषांच जास्त वजन पसंत असतं. महिलांना पार्टनरचा हा भार त्यांच्या पुरूषार्थाची जाणिव करून देतं. इंटिमेट रिलेशन वेळी महिला पुरूषांच्या शरीराच्या आकारावरही लक्ष देत असतात. त्यांचा फोकस छाती, मांड्या, बाहूंवर अधिक असतो.
पार्टनरच्या जिभेची टेस्ट
तज्ज्ञांचं मत आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जिभेची टेस्ट वेगळी असते. शारीरिक संबंध ठेवताना महिलांना त्यांच्या पार्टनरच्या जिभेची टेस्ट बारकाईने जाणवते. इतकेच नाही तर महिलांना पार्टनरच्या जिभेने स्पर्श करण्याची पद्धत आणि त्याने वाढणारी उत्तेजना चांगलीच लक्षात राहते.
पार्टनरचे बदलते हावभाव
तज्ज्ञांनुसार, शारीरिक संबंधावेळी पुरूष कसा दिसतो याचाही महिलांवर प्रभाव पडतो. शारीरिक संबंध ठेवण्यादरम्यान पुरूष फार उत्तेजित होतात. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर येणारे हावभावही महिला नोटीस करतात.