लैंगिक जीवन : 'हे' पुरूष देऊ शकतात महिलांना बेस्ट ऑर्गॅज्मचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 03:44 PM2019-07-01T15:44:53+5:302019-07-01T15:48:33+5:30
या रिसर्च अंतर्गत १०३ महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते आणि त्यांना त्यांच्या लैंगिक जीवनाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले.
सोशिओअपेक्टिव न्यूरोसायन्स अॅन्ड सायकॉलॉजीच्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, गंमत करणारे लोक ऑर्गॅज्मचा सर्वात चांगला अनुभव देऊ शकतात. जर तुमचा स्वभाव फनी म्हणजेच गमतीदार असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सर्वात चांगला ऑर्गॅज्मचा अनुभव देण्यास यशस्वी होऊ शकता, असं विज्ञानाचं म्हणणं आहे.
psychologytoday.com वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, महिलांना नेहमीच चांगला सेन्स ऑफ ह्यूमर असलेले लोक पसंत येतात. जास्तीत जास्त महिला हेच उत्तर देतील की, त्यांना चांगल्या सेन्स ऑफ ह्यूमरचे पुरूष सर्वात जास्त आवडतात. इथे आम्ही हॉट बॉडी किंवा लूक्सबाबत नाही सांगत आहोत. पण जेव्हा महिलांच्या पसंतीचा विषय येतो, तेव्हा सेन्स ऑफ ह्यूमर असलेले पुरूष बाजी मारतात.
काय आहे रिसर्च?
या रिसर्च अंतर्गत १०३ महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते आणि त्यांना त्यांच्या लैंगिक जीवनाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यात तुम्हाला ऑर्गॅज्म कसा होतो आणि बेडमध्ये त्यांना कशाप्रकारचे पुरूष पसंत आहेत? या प्रश्नांचा समावेश होता.
काय निघाले निष्कर्ष?
रिसर्चमधून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, महिलांचा ऑर्गॅज्म त्यांच्या पार्टनरच्या उत्पन्नावर, आत्मविश्वासावर आणि आकर्षणावर अवलंबून होता. तसेच त्या त्यांच्या पार्टनरप्रति किती आकर्षित आहेत, यावरही त्यांचा ऑर्गॅज्म अवलंबून होता. वेगळ्या शब्दात सांगायचं तर ज्या पुरूषांच्या बॅंक अकाऊंटमध्ये खूप पैसा, जे पुरूष सुपर हॉट आणि आत्मविश्वासू असतात ते महिलांना बेस्ट ऑर्गॅज्मचा आनंद देऊ शकतात. महिलांमध्ये ऑर्गॅज्म त्यांच्या पार्टनरच्या लूकवरही निर्भर करतं. रिसर्चमधून असाही खुलासा करण्यात आला आहे की, श्रीमंत आणि चांगला लूक असलेले पुरूष महिलांना शारीरिक संबंधात जास्त संतुष्टी देऊ शकतात.
परिणाम काय निघाला?
या रिसर्चनुसार. महिलांना बेस्ट ऑर्गॅज्म देण्यात पुरूषांचा आत्मविश्वास, लुक्स आणि बॅंक बॅलन्स महत्त्वाची भूमिका निभावतात. मग आता तुम्ही विचार करत असाल तर फनी पुरूष महिलांना बेस्ट ऑर्गॅज्म कसा देऊ शकतो. तर गंमतीदार असण्याचा अर्थ आहे चांगला सेन्स ऑफ ह्यूमर आणि अशा पुरूषांसोबत महिला फार आनंद असतात.
लैंगिक जीवनात लुक्स आणि पैशांपेक्षा जास्त महत्त्वाचा सेन्स ऑफ ह्यूमर असतो. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला खूप हसवू शकता तर तुम्ही त्यांना बेस्ट ऑर्गॅज्मही देऊ शकता. तसेच या रिसर्चमधून खालील ६ गुण असलेले पुरूष महिलांना प्रभावित करण्यात बाजी मारतात असे सांगण्यात आले आहे.
१) ह्यूमर
२) आकर्षण
३) क्रिएटिव्हिटी
४) इमोशनल अटॅचमेंट
५) विश्वास
६) लुक्स