लैंगिक जीवन : जास्त शारीरिक संबंधाने पुरूषांची 'ही' गंभीर समस्या दूर होते का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 03:01 PM2019-02-14T15:01:16+5:302019-02-14T15:01:35+5:30
इरेक्टाइल डिस्फंक्शन या समस्येने जास्तीत जास्त मध्यम वयाचे लोका जास्त ग्रस्त असतात.
इरेक्टाइल डिस्फंक्शन या समस्येने जास्तीत जास्त मध्यम वयाचे लोका जास्त ग्रस्त असतात. पण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाइलमुळे कमी वयातील लोकांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांचं लैंगिक जीवन फारच खराब सुरू असतं. आणि त्यामुळे हे लोक डिप्रेशनच्या जाळ्यातही येत असतात. त्यासोबतच याच्या कारणांबाबत सांगायचं तर हायपरटेंशन आणि डायबिटीजच्या कारणामुळे ही समस्या सर्वात जास्त होते. जेव्हा पुरूषांचं वय ६० पेक्षा अधिक असतं. तेव्हा त्यांची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा तर असते पण त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही.
अनेकजण ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा आणि उपचारांचा आधार घेतात. पण ही औषधे जास्त फायदेशीर ठरत नाहीत. उलट त्यांचे दुष्परिणामच अधिक असतात. २००८ मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिन द्रारे ५५ ते ७५ वयोगटातील ९८९ लोकांवर एक सर्व्हे केला. हे सर्व लोक कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रस्त होते. त्यातील ३२ टक्के लोकांना हायपरटेंशन, १२ टक्के लोकांना हृदयाशी संबंधित समस्या, ७ टक्के लोकांना डिप्रेशनची समस्या आणि ४ टक्के लोक डायबिटीजचे रुग्ण होते. या सर्व समस्यांच्या कारणांनी इरेक्टाइल डिस्फंशनची समस्या सर्वात जास्त होते.
रिसर्चदरम्यान या सर्व लोकांचं वेळोवेळी निरीक्षण करण्यात आलं आणि नंतर पाच वर्षांनी त्यांचं चेकअप करण्यात आलं तेव्हा काही आश्चर्यकारक तथ्य समोर आलेत. या सर्व्हेतून समोर आले की, ज्या लोकांनी आठवड्यातून एकदा शारीरिक संबंध किंवा ठेवलेच नाहीत, त्यांच्यात इरेक्टाइल डिस्फंक्शनची शक्यता दुप्पट असलेली आढळली. तर ज्यांनी आठवड्यातून एकदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा शारीरिक संबंध ठेवले त्यांच्यात ही समस्या कमी होती.
याचा अर्थ हा आहे की, जर तुम्हाला इरेक्टाइल डिस्फंक्शनचा धोका कमी करायचा असेल तर तुम्हाला या वयात अधिक वेळा शारीरिक संबंध ठेवावे लागतील. म्हणजेच नियमित शारीरिक संबंध ठेवावे लागतील. तसेच ज्या लोकांनी ५० वय ओलांडलं आहे, त्यांना ही समस्या दूर ठेवायची असेल तर त्यांना ५० वयानंतरही शारीरिक संबंध ठेवावे लागतील. याने मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य चांगलं राहील.