लैंगिक जीवन : महिला पार्टनरचा इंटरेस्ट कमी होत असेल तर....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 05:10 PM2019-05-06T17:10:50+5:302019-05-06T17:16:26+5:30
अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी पार्टनरबाबत असलेलं भावनिक आणि शारीरिक आकर्षण कमी होतं आणि त्यामुळे अर्थातच कामेच्छा कमी होते.
(Image Credit : The Irish Times)
पार्टनरची कामेच्छा कमी झाली असेल तर वैवाहिक जीवनात ही तणावपूर्ण स्थिती ठरू शकते. अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी पार्टनरबाबत असलेलं भावनिक आणि शारीरिक आकर्षण कमी होतं आणि त्यामुळे अर्थातच कामेच्छा कमी होते, असं सामान्यपणे बघायला मिळतं. तशी तर ही समस्या पुरूष किंवा महिला अशी विभागली जाऊ शकत नाही. पण सामान्यपणे महिला याबाबत काही बोलण्यास संकोच करतात. अशावेळी पतीने सपोर्टिव्ह असणं गरजेचं असतं. त्यांच्यासाठी काही टिप्स खालीलप्रमाणे सांगता येतील.
लुब्रिकन्टचा वापर
महिलांना ही समस्या अधिक फेस करावी लागते. शारीरिक संबंधावेळी नैसर्गिक ओलावा कमी असल्याने त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशावेळी अनेक तज्ज्ञ चांगल्या क्लालिटीच्या लुब्रिकंट्सचा वापर करण्यास सांगतात. पण तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतही लुब्रिकंटचा वापर करू नये.
सरप्राइज द्या
अनेकदा आपल्या हे लक्षात येत नाही की, आपल्या रोजच्या जीवनावर आणि नात्यावर अरसिकता किंवा कंटाळवाणा प्रभाव करतो. अनेक पार्टनर या कारणामुळेही शारीरिक संबंधातील रस हरवून बसतात. यापासून बचाव करण्यासाठी पार्टनरला सरप्राइज देत रहावे. पार्टनरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करावा.
जागा बदलत रहावी
बेडरूममध्ये तुम्ही नेहमी एकाच जागेवर आणि एकाचप्रकारे शारीरिक संबंध ठेवत असाल तर तुम्हाला काही महिन्यांनी कंटाळा येईल. त्यामुळे जागा बदला आणि वेगळ्या गोष्टी ट्राय करा. याने तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल.
संवाद
जर वरील गोष्टींनी काम होत नसेल तर पार्टनरसोबत मोकळेपणाने यावर बोलायला हवे. त्यांची नेमकी समस्या काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. अनेकदा काही शारीरिक समस्याही असू शकते, ज्यामुळे कामेच्छा कमी झाली असते.
फ्लर्टिंग करा
फ्लर्टिंग मूड तयार करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. शारीरिक संबंधाची सुरूवात फ्लर्टिंगने केली तर दोघांचाही आनंद व्दिगुणीत होण्यास मदत होऊ शकते.
एक्सपर्टचा सल्ला
(Image Credit : Amphetamines)
सामान्यपणे अजूनही महिला लैंगिक जीवनाबाबतच्या समस्यांवर मोकळेपणाने बोलण्यास धजावत नाहीत. पण अनेक अशा समस्या असतात ज्या तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय दूर होत नाहीत. त्यांच्याशी व्यवस्थित बोलूनच समस्या सोडवल्या जाऊ शकतात.
वेळीच सोडा
हे लक्षात ठेवा की, कोणताही काळ हा नेहमीसाठी नसतो. पार्टनरचं सहकार्य न मिळणं खरंतर तणाव वाढवणारं ठरू शकतं. पण ही स्थिती नेहमीसाठी राहणार नसते. जर पार्टनरचं मन किंवा इच्छा नाहीये तर त्यांना जबरदस्ती करू नका. ब्रेक घेऊन त्यावर तोडगा काढा.